S M L

विलासरावांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला

4 डिसेंबर, मुंबईबुधवारी सोनिया गांधी यांनी विलासरावांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर गुरुवारी सकाळी विलासराव देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला. पत्रकार परिषदेत बोलतांना मुंबईवरच्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली. "सरपंच पदापासून सुरूवात केली आणि इथवर पोहोचलो. महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री झालो" असं ते म्हणाले. त्यांनी सोनिया गांधींचे ,राज्यातील जनतेचे, सर्व सहकार्‍यांचे तसचं विरोधी पक्षाचेही आभार मानले.मीडियाचेही आभार मानायला ते विसरले नाहीत.आपल्या काळात अनेक विकास कामं झाली. समुद्र गस्तीची निर्णय प्रक्रिया सुरू झाली पण विजेचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचं त्यांनी मान्य केलं. "मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. राजीनाम्यासाठी पक्षाचा कुठलाही दबाव नव्हता, स्वत:हून राजीनामा दिला" असं ते म्हणालेयापुढे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचही ते बोलले.निवडणुकीत काँग्रेस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 12:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close