S M L

भारत-पाक मॅचविरोधात शिवसेना आक्रमक

21 डिसेंबरएकीकडे आपल्या देशावर अतिरेकी हल्ले करायचे, आपल्या देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाचा आणि एवढं होऊन सुद्धा पाकिस्तानच्या टीम सोबत भारतीय टीमने क्रिकेट खेळन योग्य नाही आम्ही अगोदरच या सामन्यांना विरोध केला होता आता मात्र जिथे कुठे मॅच होईल त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिक विरोध करतील असा थेट इशारा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलाय. 25 डिसेंबरपासून भारत पाकिस्तान दरम्यान दोन टी 20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजची घोषणा होताच शिवसेनेनं पाक टीमला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सामन्यांना कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बाळसाहेबांनी आपली भूमिका मांडली होती. सामनामधून बाळासाहेबांनी पाक टीमचा समाचार घेतलाच होता त्याचबरोबर भारतीय खेळांडूवर तोफ डागली होती. आता येत्या 25 डिसेंबर भारत-पाकिस्तानचे सामने महाराष्ट्र वगळून दिल्ली,कोलकत्ता आणि चेन्नईत भरवण्यात आले आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे केंद्रीय गृहखात्यांने संरक्षणात वाढ केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2012 03:50 PM IST

भारत-पाक मॅचविरोधात शिवसेना आक्रमक

21 डिसेंबर

एकीकडे आपल्या देशावर अतिरेकी हल्ले करायचे, आपल्या देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाचा आणि एवढं होऊन सुद्धा पाकिस्तानच्या टीम सोबत भारतीय टीमने क्रिकेट खेळन योग्य नाही आम्ही अगोदरच या सामन्यांना विरोध केला होता आता मात्र जिथे कुठे मॅच होईल त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिक विरोध करतील असा थेट इशारा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलाय. 25 डिसेंबरपासून भारत पाकिस्तान दरम्यान दोन टी 20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजची घोषणा होताच शिवसेनेनं पाक टीमला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सामन्यांना कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बाळसाहेबांनी आपली भूमिका मांडली होती. सामनामधून बाळासाहेबांनी पाक टीमचा समाचार घेतलाच होता त्याचबरोबर भारतीय खेळांडूवर तोफ डागली होती. आता येत्या 25 डिसेंबर भारत-पाकिस्तानचे सामने महाराष्ट्र वगळून दिल्ली,कोलकत्ता आणि चेन्नईत भरवण्यात आले आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे केंद्रीय गृहखात्यांने संरक्षणात वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2012 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close