S M L

'थर्टीफस्ट'ला बार,रेस्टॉरंटला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देऊ नये'

21 डिसेंबरदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. आज दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये महिला संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेता नाताळ 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर अर्थात थर्टीफस्टला बार, क्लब, रेस्टॉरंट मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना रितसर एक पत्रही लिहलं आहे. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 'थर्टीफस्ट' ची वाट पाहणार्‍या मंद्यप्रेमींच्या ओल्या पाटर्‌यांवर गदा येण्याची शक्यता आहे. थर्टीफस्टच्या रात्री मुंबईत पहाटेपर्यंत बार,रेस्टॉरंट, क्लब सुरू ठेवण्यास मुभा मिळत असते त्यामुळे पहाटेपर्यंत तळीरामांची सोय होते. पण सद्‌ध्या दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरण, दादरमध्ये महिलेवर हल्ला, मंगळवारी शिवडी परिसरात दारूच्या नशेत शुल्लक कारणावरून महिलेवर कोयत्याने वार करण्याची खळबळजणक घटना घडल्या आहेत .त्यामुळे 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह गृहमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2012 04:20 PM IST

'थर्टीफस्ट'ला बार,रेस्टॉरंटला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देऊ नये'

21 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. आज दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये महिला संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेता नाताळ 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर अर्थात थर्टीफस्टला बार, क्लब, रेस्टॉरंट मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना रितसर एक पत्रही लिहलं आहे. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 'थर्टीफस्ट' ची वाट पाहणार्‍या मंद्यप्रेमींच्या ओल्या पाटर्‌यांवर गदा येण्याची शक्यता आहे. थर्टीफस्टच्या रात्री मुंबईत पहाटेपर्यंत बार,रेस्टॉरंट, क्लब सुरू ठेवण्यास मुभा मिळत असते त्यामुळे पहाटेपर्यंत तळीरामांची सोय होते. पण सद्‌ध्या दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरण, दादरमध्ये महिलेवर हल्ला, मंगळवारी शिवडी परिसरात दारूच्या नशेत शुल्लक कारणावरून महिलेवर कोयत्याने वार करण्याची खळबळजणक घटना घडल्या आहेत .त्यामुळे 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह गृहमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2012 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close