S M L

26/11 चा मास्टरमाईंडला अटक करण्यास पाक सरकारची असमर्थता

14 डिसेंबर26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला अटक करण्यात पाकिस्ताननं पुन्हा एकदा असमर्थता दाखवली आहे. हाफिझला अटक करण्यासाठी भारतानं जे पुरावे दिलेत ते अपुरे असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांचं म्हणणंय. मलिक आज संध्याकाळी भारत भेटीवर आलेत. ते भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचीे भेट घेणार आहेत. या भेटीत 26/11 हल्ल्याचा पाकिस्तानच्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या नव्या व्हिसा कराराची अंमलबजावणी हा या भेटीचा उद्देश आहे. दोन्ही देशात संपर्क आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं गेल्या सप्टेंबरमध्ये नवा व्हिसा करार करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 05:23 PM IST

26/11 चा मास्टरमाईंडला अटक करण्यास पाक सरकारची असमर्थता

14 डिसेंबर

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला अटक करण्यात पाकिस्ताननं पुन्हा एकदा असमर्थता दाखवली आहे. हाफिझला अटक करण्यासाठी भारतानं जे पुरावे दिलेत ते अपुरे असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांचं म्हणणंय. मलिक आज संध्याकाळी भारत भेटीवर आलेत. ते भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचीे भेट घेणार आहेत. या भेटीत 26/11 हल्ल्याचा पाकिस्तानच्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या नव्या व्हिसा कराराची अंमलबजावणी हा या भेटीचा उद्देश आहे. दोन्ही देशात संपर्क आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं गेल्या सप्टेंबरमध्ये नवा व्हिसा करार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close