S M L

वडील आणि भावाने केला तरुणीवर बलात्कार

30 डिसेंबरएकीकडे देशभरात महिलांवरील अत्याचाराविरोधात जनक्षोभ उसळला असताना डोंबिवलीत माणुसकीला आणि नात्यांना काळिमा फासणारी घटना उघड झालीये. 18 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि नंतर सख्या भावानेच बलात्कार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलीची आई दोन वर्षापुर्वी घटस्फोट घेऊन घर सोडून गेली. त्यानंतर या मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केले. दोन महिन्यांपुर्वी तिच्या मोठ्या भावालाही हा प्रकार समजला. त्यावेळी त्याने बहिनीला मदत करण्याऐवजी त्यानंही गैरफायदा घेतला. रक्ताच्या नात्यांनीच जीवन उद्धवस्थ केलेल्या या मुलीची घुसमट तिच्या मैत्रीणीने आपल्या आईच्या मदतीने पोलिसांसमोर आणली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधन बाप आणि मुलाला अटक केली, कल्याण कोर्टाने या दोघा आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2012 10:10 AM IST

वडील आणि भावाने केला तरुणीवर बलात्कार

30 डिसेंबर

एकीकडे देशभरात महिलांवरील अत्याचाराविरोधात जनक्षोभ उसळला असताना डोंबिवलीत माणुसकीला आणि नात्यांना काळिमा फासणारी घटना उघड झालीये. 18 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि नंतर सख्या भावानेच बलात्कार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलीची आई दोन वर्षापुर्वी घटस्फोट घेऊन घर सोडून गेली. त्यानंतर या मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केले. दोन महिन्यांपुर्वी तिच्या मोठ्या भावालाही हा प्रकार समजला. त्यावेळी त्याने बहिनीला मदत करण्याऐवजी त्यानंही गैरफायदा घेतला. रक्ताच्या नात्यांनीच जीवन उद्धवस्थ केलेल्या या मुलीची घुसमट तिच्या मैत्रीणीने आपल्या आईच्या मदतीने पोलिसांसमोर आणली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधन बाप आणि मुलाला अटक केली, कल्याण कोर्टाने या दोघा आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2012 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close