S M L

सत्तेच्या दारावर असंतोषाचा उद्रेक;पोलिसांकडून लाठीचार्ज

22 डिसेंबरदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून देशभरात याचे पडसाद उमटत आहे. आज सकाळी हजारो तरूणांचा जथा इंडिया गेटपासून सुरू झालेली निदर्शनं राजपथावरून प्रवास करत थेट राष्ट्रपती भवनावर धडकली. दिवसभर पोलीस आणि निदर्शकांमध्ये मोठा संघर्ष उभा ठाकला. आता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कडक भूमिका घेतली असून आंदोलकांवर पोलीस तुटून पडले आहे. भेटेल तिथे आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला जात आहे. पोलिसांनी पूर्ण ताकद जमावाला पांगवण्यासाठी लावून दिली आहे. मात्र जमाव मागे हटायला तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आंदोलकांची भेट घेणार असल्याची दिल्ली पोलिसांनी घोषणा केलीय. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. पण रायसिना हिल परिसरात वातावरण तणावमय आहे. या जमावात कॉलेजमधील तरूण,तरूणी, स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. आज रात्रभर आम्ही इथंच थांबणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मात्र परिसर कोणत्याही परिस्थिती खाली करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलाय. या आंदोलनाला संसद, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालय असल्यामुळे या भागात निदर्शनांना परवानगी नाकारण्यात आली होती. पण जमावा वाढतच चालत असल्यामुळे पोलिसांनी तरूण निदर्शकांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावर अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे मारण्यात आले. तरीसुद्धा शेकडो निदर्शक संपूर्ण राजपथावरून मागे हटण्यास तयार नाही. दिल्लीतल्या आणि देशातल्या महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचला, अशी मागणी निदर्शकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2012 12:42 PM IST

सत्तेच्या दारावर असंतोषाचा उद्रेक;पोलिसांकडून लाठीचार्ज

22 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून देशभरात याचे पडसाद उमटत आहे. आज सकाळी हजारो तरूणांचा जथा इंडिया गेटपासून सुरू झालेली निदर्शनं राजपथावरून प्रवास करत थेट राष्ट्रपती भवनावर धडकली. दिवसभर पोलीस आणि निदर्शकांमध्ये मोठा संघर्ष उभा ठाकला. आता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कडक भूमिका घेतली असून आंदोलकांवर पोलीस तुटून पडले आहे. भेटेल तिथे आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला जात आहे. पोलिसांनी पूर्ण ताकद जमावाला पांगवण्यासाठी लावून दिली आहे. मात्र जमाव मागे हटायला तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आंदोलकांची भेट घेणार असल्याची दिल्ली पोलिसांनी घोषणा केलीय.

राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. पण रायसिना हिल परिसरात वातावरण तणावमय आहे. या जमावात कॉलेजमधील तरूण,तरूणी, स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. आज रात्रभर आम्ही इथंच थांबणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मात्र परिसर कोणत्याही परिस्थिती खाली करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलाय. या आंदोलनाला संसद, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालय असल्यामुळे या भागात निदर्शनांना परवानगी नाकारण्यात आली होती. पण जमावा वाढतच चालत असल्यामुळे पोलिसांनी तरूण निदर्शकांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावर अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे मारण्यात आले. तरीसुद्धा शेकडो निदर्शक संपूर्ण राजपथावरून मागे हटण्यास तयार नाही. दिल्लीतल्या आणि देशातल्या महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचला, अशी मागणी निदर्शकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2012 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close