S M L

मुख्यमंत्री पदाचे दावेदार

3 डिसेंबर, मुंबई मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा निर्णय पक्षीय बैठकीत आला. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुशीलकुमार शिंदेच्याबरोबरीनं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत महसूल मंत्री नारायण राणे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे. दोघेही मातब्बर नेते असून मुख्यमंत्र्यांची कोणाला खुर्ची कोणाला मिळतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दोघांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. नारायण राणे. शिवसेनेत असताना त्यांनी आठ महिने मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं. शिंदेच्या सोबत पवारांनी राणेंच्या नावाला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे राणेंचा भाव वधारला आहे. राणेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती अर्थातच शिवसेनेपासून. 1984 साली राणे शिवसेनेच्या चेंबूरच्या शाखेचे प्रमुख झाले. 1987 ते 1990 या काळात ते गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख होते. 1988 ते 1991 या काळात राणे हे बेस्टचे चेअरमन होते. मालवणच्या कणकवली मतदारसंघातून राणे 1990 ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. ते आजतागायत ते त्याच मतदार संघातून निवडून येत आहेत. 2002 साली राणेंची शिवसेना नेतेपदी निवड झाली. मार्च 1995 ते मार्च 1996 याकाळात राणेंकडे दुग्धविकास, पशूसंवर्धन मत्स्योद्योग खातं होतं. मार्च 96 ते जानेवारी 99 या काळात ते महसूल आणि पुनर्वसन मंत्री होते. सेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत असताना शेवटच्या एक वर्षात ते मुख्यमंत्री झाले. 30 जुलै 2005 ला राणेंनी अखेर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरेंशी असलेल्या मतभेदातून आणि शिवसेनेत होणार्‍या घुसमटीतून त्यांनी शिवसेना सोडली. काँग्रेसमध्ये त्यांना महसूलमंत्री मंत्रीपद देण्यात आलं आणि मुख्यमंत्री करण्याचं आश्वासनंही. राणे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. मात्र, विलासरावांच्या विरोधात वारंवारं बंड केल्यानं त्यांचं पक्षातलं महत्त्व कमी झालंय. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आणि पवारांची अनुकूलता हे भांडवल राणेंकडे आहे. पैसा ही त्यांची आणखी एक ताकद आहे. राणे हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असताना किक्रेट खेळायचे. राणेंकडे हा शेवटचा बॉल आहे. चेतन शर्मांच्या बॉलवर जसा शेवटच्या क्षणी जावेद मियादादनं सिक्स मारला होता आणि मॅच जिंकली होती तसं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राणेंचा सिक्स लागतो की ते क्लिन बोल्ड होतात ते बघायचंय.मुख्यमंत्री पदी चर्चेत असलेलं दुसरं नाव अशोक चव्हाण. शरद पवारांचे कट्टर विरोधक असलेले शंकरराव चव्हाण यांचे ते चिरंजीव आणि सध्याचे उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री. अशोक चव्हाण यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं येतयं. त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर...29 ऑक्टोबरला आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करणारे अशोक चव्हाण हे मूळचे पैठणमधल्या कापेश्वर गावचे. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती नांदेड मधून. 25 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. मुंबईलाच पदवी आणि एमबीएचं शिक्षण घेऊन चव्हाण नांदेडच्या राजकारणात सक्रीय झाले. काही दिवस युवक काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर 1987ची निवडणुकीत ते नांदेडचे खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आले. 1993 ला त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास तसंच गृहराज्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर 99 ला मुदखेड मतदार संघातूंन निवडून येत विलासरावांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून अशोकरावांनी कारभार सांभाळला आणि 2004च्या निवडणुकीत पुन्हा बाजी मारत विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेटमंत्री झाले. कॉँग्रेसशी पहिल्यापासून एकनिष्ठ तसंच सोनिया गांधीशी जवळीक हीच चव्हाणांची जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 12:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close