S M L

देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर

3 डिसेंबर, नवी दिल्ली वरुण कुमारअर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडे गृहखातं सोपवण्यात आलंय आणि आता पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थखातं सांभाळतील. देशासमोर सध्या बरीच आर्थिक आव्हानं आहेत. 1991 साली देशात परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात तेव्हा अर्थखातं सांभाळणार्‍या मनमोहन सिंग यांचाच पुढाकार होता. मात्र मंदीमुळे अनेक आर्थिक अडचणींचे डोंगर समोर उभे असतानाच त्यांना आता पंतप्रधानपद आणि अर्थमंत्रीपदासारख्या दोन महत्त्वाच्या आघाड्या संाभाळायच्या आहेत. मनमोहन सिंग यांनी पूर्वी आरबीआयचे प्रमुख म्हणून देखील कामकाज केलंय. त्यामुळे मॉनिटरी पॉलिसीज ठरवताना रिझर्व्ह बँकेशी ताळमेळ ठेवणं त्यांना सोपं जाईल. सतत चढत्या महागाई दरावर ताबा मिळवताना आरबीआयनं व्याजदरांमध्ये कपात केलीच आहे. त्यामुळे महागाई दराची समस्या तात्पुरती बाजूला पडलीय. मंदीच्या प्रभावामुळे भारतीय शेअरबाजारातही मोठी घसरण झालीय. त्यामुळे विदेशी वित्तीय संस्थांची गुंतवणुकही रोडावलीय. देशाचा विकास दरही खूपसा समाधानकारक नाहीये. निवडणुकाही तोंडावर आहेत . त्यामुळे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्यापुढे देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्यासाठी फार कमी वेळ उरलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 01:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close