S M L

अटीतटीच्या लढतीत भारताचा पराभव

25 डिसेंबरबेंगळुर येथे झालेल्या भारत पाकिस्तान दरम्यान पहिल्या टी-20 सामान्यात पाकने 5 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताने दिलेल्या 134 धावांचे आव्हान पाक टीमने 19.4 ओव्हरर्समध्ये पूर्ण केले. मोहंमज हाफिजच्या 61 धावांच्या दमदार खेळीवर पाकला हा विजय संपादीत करता आला तर मधल्या फळीतला शोयब मलिकने 57 धावांवर नॉट आऊट राहून टीमला विजय मिळवून दिला. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. मात्र दोन्ही देशातील संबंध सुधारावे यासाठी पाच वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन टी- 20 आणि तीन वनडे सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. आज पहिली टी-20 मॅच बेंगळुर येथील चेन्नास्वामी स्टेडियमवर पार पडली. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत 9 गडीवर बाद 133 धावा केल्या. अजिंक्य राहणे आणि गौतम यांनी धडाकेबाज सुरूवात करत भारताचा स्कोअर सुस्थिती नेऊन ठेवला. पण अजिंक्यने 42 धावा तर गौतम गंभीरने 43 धावांवर आऊट झाला. त्यांनंतर भारताचा डाव पत्याचा बंगल्यासारखा कोसळला. उमर गुलने दमदार बॉलिंग करत टीम इंडियाची हवा गुल केली. भारताची टॉपचे फलंदाज विराट कोहली, महेंद्रसिंग धोणी, सुरेश रैना आणि रोहित शर्मा पटापट आऊट झाले. तळातल्या फलंदाजानी शर्थीचे प्रयत्न करत भारताचा स्कोअर 133 धावांवर नेला. 133 धावांचा पाठलाग करत पाकची सुरुवात निराशजनक झाली. भुवनेश्वर कुमारने नासिर जमशेद,अहमद शहजाद आणि उमर अकमल यांना तंबूचा रस्ता दाखवला. मात्र मोहंमज हाफीज आणि शोयब मलिकने संयमी खेळी करत टीमचा डाव सावरला. पण ईशांत शर्माने हाफीजला 61 धावांवर आऊट करत ही जोडी फोडून काढली. मात्र मलिकने बाजू सावरत टीमला भारताविरूद्ध पहिला विजय मिळवून दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2012 05:08 PM IST

अटीतटीच्या लढतीत भारताचा पराभव

25 डिसेंबर

बेंगळुर येथे झालेल्या भारत पाकिस्तान दरम्यान पहिल्या टी-20 सामान्यात पाकने 5 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताने दिलेल्या 134 धावांचे आव्हान पाक टीमने 19.4 ओव्हरर्समध्ये पूर्ण केले. मोहंमज हाफिजच्या 61 धावांच्या दमदार खेळीवर पाकला हा विजय संपादीत करता आला तर मधल्या फळीतला शोयब मलिकने 57 धावांवर नॉट आऊट राहून टीमला विजय मिळवून दिला. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. मात्र दोन्ही देशातील संबंध सुधारावे यासाठी पाच वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन टी- 20 आणि तीन वनडे सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. आज पहिली टी-20 मॅच बेंगळुर येथील चेन्नास्वामी स्टेडियमवर पार पडली. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत 9 गडीवर बाद 133 धावा केल्या. अजिंक्य राहणे आणि गौतम यांनी धडाकेबाज सुरूवात करत भारताचा स्कोअर सुस्थिती नेऊन ठेवला. पण अजिंक्यने 42 धावा तर गौतम गंभीरने 43 धावांवर आऊट झाला. त्यांनंतर भारताचा डाव पत्याचा बंगल्यासारखा कोसळला. उमर गुलने दमदार बॉलिंग करत टीम इंडियाची हवा गुल केली. भारताची टॉपचे फलंदाज विराट कोहली, महेंद्रसिंग धोणी, सुरेश रैना आणि रोहित शर्मा पटापट आऊट झाले. तळातल्या फलंदाजानी शर्थीचे प्रयत्न करत भारताचा स्कोअर 133 धावांवर नेला. 133 धावांचा पाठलाग करत पाकची सुरुवात निराशजनक झाली. भुवनेश्वर कुमारने नासिर जमशेद,अहमद शहजाद आणि उमर अकमल यांना तंबूचा रस्ता दाखवला. मात्र मोहंमज हाफीज आणि शोयब मलिकने संयमी खेळी करत टीमचा डाव सावरला. पण ईशांत शर्माने हाफीजला 61 धावांवर आऊट करत ही जोडी फोडून काढली. मात्र मलिकने बाजू सावरत टीमला भारताविरूद्ध पहिला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2012 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close