S M L

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, 4 मंत्र्यांना मिळणार डच्चू?

31 डिसेंबरयेत्या नव्या वर्षात राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्ह दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय. या चार मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी एखाद दुसर्‍या राज्यमंत्र्यांला बढती देऊन काही नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. ही नावं निश्चित करण्यासाठी येत्या चार किंवा पाच जानेवारीला शरद पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळाबरोबरच मतदारसंघातील सुमार कामगिरी हा निकष ठरवण्यात आलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 09:23 AM IST

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, 4 मंत्र्यांना मिळणार डच्चू?

31 डिसेंबर

येत्या नव्या वर्षात राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्ह दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय. या चार मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी एखाद दुसर्‍या राज्यमंत्र्यांला बढती देऊन काही नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. ही नावं निश्चित करण्यासाठी येत्या चार किंवा पाच जानेवारीला शरद पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळाबरोबरच मतदारसंघातील सुमार कामगिरी हा निकष ठरवण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close