S M L

नागपुरातल्या हॉटेलमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवली

4 डिसेंबर, नागपूरकल्पना नळसकरमुबंईतल्या हल्ल्याची पुनरावृत्ती राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात होऊ नये यासाठी काळजी घेतली जातेय. शहरातल्या सर्व नामांकित हॉटेलमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था राबवण्याचे आदेश नागपूर पोलिसांनी दिले आहेत.नागपुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'सेंटर पॉईन्ट' हॉटेलमध्ये लोकांची नेहमीच गर्दी असते. परदेशी लोकांचासुद्धा ओढा याच हॉटेलकडे जास्त असतो. त्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. "मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही हॉटलची सिक्युरिटी वाढवली आहे. मेटल डिटेक्टर बसवले आहेत. गाड्यांचं चेकिंग सुरू केलं आहे" असं सेंटर पॉइन्ट हॉटेलचे मॅनेजर जयदीप मुजुमदार यांनी सांगितलं.याच हॉटेल सारखी आता नागपूरातील सगळी हॉटेल्स सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याच्या कामला लागली आहेत नागपूर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासाठी सगळ्या हॉटेल्सना आठ दिवसांची मुदत दिली आहे. नागपूरमध्ये जवळपास 30 नामांकित हॉटेल्स आहेत. परंतु या सर्वांना पोलीस सुरक्षा देणं शक्य नसल्यानं हॉटेल मालकांनीच सुरक्षा व्यवस्था करावी, असा निर्णय घेण्यात आलाय. "मुंबईत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सगळ्या मोठ्या हॉटेल्सना, जिकडे जास्त प्रवासी योतात अशांना जास्त सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. आधी चेकिंग होत नव्हतं, पण आता सामानाची चेकिंग करण्याचे निर्देस देण्यात आले आहेत" अशी माहिती नागपूरचे अ‍ॅडिशनल सीपी बाबासाहेब कंगाले यांनी दिली आहे.मेटल डिटेक्टर बसवणे, ग्राहकांची कसून चौकशी, त्यांची व्यवस्थित नोंद ठेवणे त्याचबरोबर हॉटेलमध्ये किती लोक काम करतात, याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस लक्ष ठेवणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 01:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close