S M L

'2014मध्ये राष्ट्रवादीला 1 नंबरचा पक्ष बनवणार'

28 डिसेंबरकाँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असताना आज काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीनं मात्र काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. तसंच येत्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नंबर 1 चा पक्ष बनवण्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तर राष्ट्रवादी पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायला तयार आहे, शरद पवारांनी आदेश दिल्यास सर्व निवडणुका स्वबळावर लढू असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितलंय. तर सिंचनाच्या प्रश्नावरून फक्त बदनामीचं राजकारण करण्यात आलं, अजित पवार मंत्रिमंडळात आल्यानं कामाचा वेग वाढेल असं म्हणत पिचड यांनी काँग्रेसला टोला लगावला. इंदू मिलच्या प्रश्नावर श्रेय घेऊ नये, तो मुद्दा आधी राष्ट्रवादीनं मांडला होता असा टोलाही पिचड यांनी काँग्रेसला लगावलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 10:31 AM IST

'2014मध्ये राष्ट्रवादीला 1 नंबरचा पक्ष बनवणार'

28 डिसेंबर

काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असताना आज काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीनं मात्र काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. तसंच येत्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नंबर 1 चा पक्ष बनवण्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तर राष्ट्रवादी पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायला तयार आहे, शरद पवारांनी आदेश दिल्यास सर्व निवडणुका स्वबळावर लढू असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितलंय. तर सिंचनाच्या प्रश्नावरून फक्त बदनामीचं राजकारण करण्यात आलं, अजित पवार मंत्रिमंडळात आल्यानं कामाचा वेग वाढेल असं म्हणत पिचड यांनी काँग्रेसला टोला लगावला. इंदू मिलच्या प्रश्नावर श्रेय घेऊ नये, तो मुद्दा आधी राष्ट्रवादीनं मांडला होता असा टोलाही पिचड यांनी काँग्रेसला लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close