S M L

आंदोलनाला हिंसक वळण

23 डिसेंबरदिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी सलग सातव्या दिवशीही तरुणांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. मात्र शांतीपूर्ण चाललेल्या आंदोलनला आज हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी आज सकाळी संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू केली पण जमाव येतच राहिला. पोलीस आणि आंदोलकांध्ये आज दिवसभर धुमश्चक्री सुरु आहे. इंडिया गेटजवळ जमलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासोबतच लाठीचार्ज केला. पण तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या आंदोलनकांनी उत्तर म्हणून पोलिसांवर दगडफेक केली. तर काही आंदोलकांनी 26 जानेवारी निमित्त तयार करण्यात आलेल्या बेंचची जाळपोळ केली. इंडिया गेटच्या परिसरात संतप्त आंदोलकांनी एक खासगी कार उलटवून लावली. पोलिसांच्या वाहनाची प्रचंड तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. तर पोलिसांनी प्रसारमाध्यमांवर सुद्धा आसुड उगारला. पत्रकारांवर पाण्याचा मारा करण्यात आला असून पत्रकारांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शांततापूर्ण आंदोलन करावे तोडफोड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. भाजपच्या प्रवक्त्या सुषमा स्वराज यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. तसंच सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात यावी अशी मागणीही स्वराज यांनी केलीय. राजकीय पक्षांची घुसखोरी'न्याय द्या, न्याय द्या'ची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून देशभरात तरूणाई रस्त्यावर उतरली आहे. तर दोन दिवसांपासून सत्तेच्या दारावर तरूणांनी ठिय्या धरला आहे. मात्र आज या तरूणाईच्या आंदोलनात राजकीय पक्षांनी घुसखोरी केली. योगगुरू रामदेव बाबा, नव्याने उदयाला आलेली आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासह काही स्थानिक पक्षांनी या आंदोलनात शिरकाव केला त्यामुळे आंदोलनला हिंसक वळण मिळाले असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी सकाळी एका बसवर उभे राहून फिल्मी एंट्री केली. रामदेव बाबा यांच्यावर जमावाला भडकावण्याचा आरोप ठेवून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आंदोलकांनाही बाब खटकली. आम्ही सात दिवसांपासून आंदोलन करतोय तेव्हा कुठे गेली होती ही लोकं ? असा संतप्त सवाल तरूण आंदोलकांनी उपस्थित केला. दिवसभरातला घटनाक्रमसकाळी 7.30 वाजता - पोलिसांनी इंडिया गेट आणि विजय चौकातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.सकाळी 9 वाजता - इंडिया गेट परिसरातले मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आले, राष्ट्रपती भवनाकडे जाणारे मार्गही कठडे लावून अडवण्यात आले.सकाळी 9.20 वाजता - दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता - आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न, CRPF आणि दिल्ली पोलिसांचा मोठा ताफा इंडिया गेटवर तैनात करण्यात आला.दुपारी 12.15 वाजता - सोनियांची आंदोलकांची भेट घेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलंदुपारी 1.30 वाजता - इंडिया गेटवरची आंदोलकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केलादुपारी 2.45 वाजता - पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारी 3.15 वाजता - काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दुपारी 3.50 वाजता - आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली.आंदोलकांनी काही कठड्यांना आग लावलीसंध्याकाळी 5.15 वाजता - पोलिसांनी पुन्हा एकदा पाण्याचा मारा, अश्रूधूराच्या नळकांड्या आणि लाठीमार केला, यामुळे इंडियागेटवरचे आंदोलक पांगलेसंध्याकाळी 6.15 वाजता - आंदोलक पुन्हा इंडियागेटवर जमायला सुरुवात झाली. साडे सहापर्यंत मोठ्या प्रमाणावर आंदोलक गोळा झाले आणि दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2012 01:50 PM IST

आंदोलनाला हिंसक वळण

23 डिसेंबर

दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी सलग सातव्या दिवशीही तरुणांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. मात्र शांतीपूर्ण चाललेल्या आंदोलनला आज हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी आज सकाळी संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू केली पण जमाव येतच राहिला. पोलीस आणि आंदोलकांध्ये आज दिवसभर धुमश्चक्री सुरु आहे.

इंडिया गेटजवळ जमलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासोबतच लाठीचार्ज केला. पण तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या आंदोलनकांनी उत्तर म्हणून पोलिसांवर दगडफेक केली. तर काही आंदोलकांनी 26 जानेवारी निमित्त तयार करण्यात आलेल्या बेंचची जाळपोळ केली. इंडिया गेटच्या परिसरात संतप्त आंदोलकांनी एक खासगी कार उलटवून लावली. पोलिसांच्या वाहनाची प्रचंड तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. तर पोलिसांनी प्रसारमाध्यमांवर सुद्धा आसुड उगारला. पत्रकारांवर पाण्याचा मारा करण्यात आला असून पत्रकारांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शांततापूर्ण आंदोलन करावे तोडफोड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. भाजपच्या प्रवक्त्या सुषमा स्वराज यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. तसंच सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात यावी अशी मागणीही स्वराज यांनी केलीय.

राजकीय पक्षांची घुसखोरी

'न्याय द्या, न्याय द्या'ची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून देशभरात तरूणाई रस्त्यावर उतरली आहे. तर दोन दिवसांपासून सत्तेच्या दारावर तरूणांनी ठिय्या धरला आहे. मात्र आज या तरूणाईच्या आंदोलनात राजकीय पक्षांनी घुसखोरी केली. योगगुरू रामदेव बाबा, नव्याने उदयाला आलेली आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासह काही स्थानिक पक्षांनी या आंदोलनात शिरकाव केला त्यामुळे आंदोलनला हिंसक वळण मिळाले असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी सकाळी एका बसवर उभे राहून फिल्मी एंट्री केली. रामदेव बाबा यांच्यावर जमावाला भडकावण्याचा आरोप ठेवून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आंदोलकांनाही बाब खटकली. आम्ही सात दिवसांपासून आंदोलन करतोय तेव्हा कुठे गेली होती ही लोकं ? असा संतप्त सवाल तरूण आंदोलकांनी उपस्थित केला.

दिवसभरातला घटनाक्रमसकाळी 7.30 वाजता - पोलिसांनी इंडिया गेट आणि विजय चौकातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.सकाळी 9 वाजता - इंडिया गेट परिसरातले मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आले, राष्ट्रपती भवनाकडे जाणारे मार्गही कठडे लावून अडवण्यात आले.सकाळी 9.20 वाजता - दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता - आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न, CRPF आणि दिल्ली पोलिसांचा मोठा ताफा इंडिया गेटवर तैनात करण्यात आला.दुपारी 12.15 वाजता - सोनियांची आंदोलकांची भेट घेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलंदुपारी 1.30 वाजता - इंडिया गेटवरची आंदोलकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केलादुपारी 2.45 वाजता - पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारी 3.15 वाजता - काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दुपारी 3.50 वाजता - आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली.आंदोलकांनी काही कठड्यांना आग लावलीसंध्याकाळी 5.15 वाजता - पोलिसांनी पुन्हा एकदा पाण्याचा मारा, अश्रूधूराच्या नळकांड्या आणि लाठीमार केला, यामुळे इंडियागेटवरचे आंदोलक पांगलेसंध्याकाळी 6.15 वाजता - आंदोलक पुन्हा इंडियागेटवर जमायला सुरुवात झाली. साडे सहापर्यंत मोठ्या प्रमाणावर आंदोलक गोळा झाले आणि दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2012 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close