S M L

'नयना पुजारीच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा'

05 जानेवारीएकीकडे दिल्लीतील बलात्कारांच्या घटनेमुळे देश पेटून उटला. मात्र नैना पुजारी सारख्या निरपराध मुलीला बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला. आणि यातील आरोपी दीड वर्षांपासून फरार आहे यांची साधी दखल सुध्दा पोलिसांकडून घेतली जात नाही. या करिता पुण्यातील शनिवार वाड्या समोर नयनाचे पती अभिजीत पुजारी आणि कॉम्रेड मुक्ता मनोहर यांनी आज मूक आंदोलन केलं. नयना पुजारी हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी अभिजीत पुजारी यांनी केली. 2009 मध्ये नयना पुजारीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षापूर्वी नयना पुजारी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश राऊत पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. अजूनपर्यंत पोलिसांना या फरार आरोपीला अटक करायला यश आलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2013 10:14 AM IST

'नयना पुजारीच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा'

05 जानेवारी

एकीकडे दिल्लीतील बलात्कारांच्या घटनेमुळे देश पेटून उटला. मात्र नैना पुजारी सारख्या निरपराध मुलीला बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला. आणि यातील आरोपी दीड वर्षांपासून फरार आहे यांची साधी दखल सुध्दा पोलिसांकडून घेतली जात नाही. या करिता पुण्यातील शनिवार वाड्या समोर नयनाचे पती अभिजीत पुजारी आणि कॉम्रेड मुक्ता मनोहर यांनी आज मूक आंदोलन केलं. नयना पुजारी हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी अभिजीत पुजारी यांनी केली. 2009 मध्ये नयना पुजारीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षापूर्वी नयना पुजारी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश राऊत पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. अजूनपर्यंत पोलिसांना या फरार आरोपीला अटक करायला यश आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2013 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close