S M L

रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

02 जानेवारीमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांनी विधानभवनात उमेदवारीचा अर्ज भरला असून राज्यसभेसाठी त्यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांच्या नावावर निवडी अगोदरच शिक्कामोर्तब झालंय. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिष्टाई कामास आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर विरोधी पक्षांनी रजनी पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभा करायचा नाही असा निर्णय सेना भाजपनं घेतला. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. पण विरोधीपक्षाने अगोदरच निर्णय जाहीर केल्यामुळे रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. रजनी पाटील यांनी अर्ज भरला यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यावेळी उपस्थित होते. रजनीताई सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात. या जागेसाठी शिवराज पाटील चाकुरकर, रोहिदास पाटील, अनिस अहमद आदी जण स्पर्धेत होते. पण मराठवाड्याची जागा मराठवाड्याकडं आणि महिलेला देण्याचा निर्णय सोनिया गांधींना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 10:28 AM IST

रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

02 जानेवारी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांनी विधानभवनात उमेदवारीचा अर्ज भरला असून राज्यसभेसाठी त्यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांच्या नावावर निवडी अगोदरच शिक्कामोर्तब झालंय. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिष्टाई कामास आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर विरोधी पक्षांनी रजनी पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभा करायचा नाही असा निर्णय सेना भाजपनं घेतला. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. पण विरोधीपक्षाने अगोदरच निर्णय जाहीर केल्यामुळे रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. रजनी पाटील यांनी अर्ज भरला यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यावेळी उपस्थित होते. रजनीताई सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात. या जागेसाठी शिवराज पाटील चाकुरकर, रोहिदास पाटील, अनिस अहमद आदी जण स्पर्धेत होते. पण मराठवाड्याची जागा मराठवाड्याकडं आणि महिलेला देण्याचा निर्णय सोनिया गांधींना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close