S M L

'दुष्काळाची परिस्थिती गंभीर'

28 डिसेंबरराज्यात अन्नधान्याची कमतरता नाही पण यंदाचा दुष्काळ गंभीर आहे कारण राज्यात पाणी नाही ही परिस्थिती गंभीर आहे यामुळे अक्षरश: झोप उडालीय. जायकवाडीत पाणी नाही,उजणी धरणात पाणी नाही जिल्ह्याजिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावरून तणाव निर्माण होत आहे आता पाण्याला प्रथम प्राधान्य देऊन लवकरात लवकर उपाय योजना करण्याची गरज आहे अशी खंत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलीय. यासाठी दुष्काळ निवारणासाठी आराखडा तयार केला जावा आणि राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जावं आणि कामाला लागण्याचे आदेशही शरद पवारांनी दिलेत. उपलब्ध पाण्याचं व्यवस्थित नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पिण्यासाठी पाणी, पशुधनासाठी चारा, दिर्घ पल्ल्याची पीकं आणि नंतर इतर गोष्टीसाठी पाणी याप्रमाणे काम करण्याच्या सूचनाही शरद पवारांनी दिल्या आहेत. तर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना फी माफ करण्यात यावी अशी सुचनाही शरद पवारांनी केल्या आहेत. शरद पवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे - महिलांच्या सुरक्षेसाठी समाज परिवर्तन आवश्यक - स्त्रियांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे - दिल्लीच्या घटनेनंतर लोकांचा संताप स्वाभाविक - दुष्काळाच्या प्रश्नाकडे अत्यंत गांभिर्याने पाहावे लागेल- पीण्यासाठी, पशुधनासाठी चारा, दिर्घ पल्ल्याची पीकं आणि नंतर इतर गोष्टीसाठी पाणी- दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी माफ करा- केंद्र सरकार दुष्काळग्रस्त भागासाठी रु. 778 कोटी देणार - निवडणुका कधी येतील, हे आता सांगता येणार नाही - देश आर्थिक संकटात, निवडणुकीनंतर स्थैर्याची गरज - राज्यात प्रकल्पांना विलंब होतोय, हे खरंय - अन्न सुरक्षा कायद्यामुळे शेतकर्‍यांना भाव मिळणार नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 10:15 AM IST

'दुष्काळाची परिस्थिती गंभीर'

28 डिसेंबर

राज्यात अन्नधान्याची कमतरता नाही पण यंदाचा दुष्काळ गंभीर आहे कारण राज्यात पाणी नाही ही परिस्थिती गंभीर आहे यामुळे अक्षरश: झोप उडालीय. जायकवाडीत पाणी नाही,उजणी धरणात पाणी नाही जिल्ह्याजिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावरून तणाव निर्माण होत आहे आता पाण्याला प्रथम प्राधान्य देऊन लवकरात लवकर उपाय योजना करण्याची गरज आहे अशी खंत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलीय. यासाठी दुष्काळ निवारणासाठी आराखडा तयार केला जावा आणि राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जावं आणि कामाला लागण्याचे आदेशही शरद पवारांनी दिलेत. उपलब्ध पाण्याचं व्यवस्थित नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पिण्यासाठी पाणी, पशुधनासाठी चारा, दिर्घ पल्ल्याची पीकं आणि नंतर इतर गोष्टीसाठी पाणी याप्रमाणे काम करण्याच्या सूचनाही शरद पवारांनी दिल्या आहेत. तर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना फी माफ करण्यात यावी अशी सुचनाही शरद पवारांनी केल्या आहेत.

शरद पवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- महिलांच्या सुरक्षेसाठी समाज परिवर्तन आवश्यक - स्त्रियांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे - दिल्लीच्या घटनेनंतर लोकांचा संताप स्वाभाविक - दुष्काळाच्या प्रश्नाकडे अत्यंत गांभिर्याने पाहावे लागेल- पीण्यासाठी, पशुधनासाठी चारा, दिर्घ पल्ल्याची पीकं आणि नंतर इतर गोष्टीसाठी पाणी- दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी माफ करा- केंद्र सरकार दुष्काळग्रस्त भागासाठी रु. 778 कोटी देणार - निवडणुका कधी येतील, हे आता सांगता येणार नाही - देश आर्थिक संकटात, निवडणुकीनंतर स्थैर्याची गरज - राज्यात प्रकल्पांना विलंब होतोय, हे खरंय - अन्न सुरक्षा कायद्यामुळे शेतकर्‍यांना भाव मिळणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close