S M L

अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसचा दिलासा

28 डिसेंबरदिल्लीत महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणार्‍या महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे खासदार अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसनं दिलासा दिलाय. अभिजीत मुखर्जी यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितल्यानं त्यांच्यावर कारवाईची गरज नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. महिलाविरोधातल्या वाढत्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत मुखर्जी यांनी मेणबत्या मिरवणं ही आज फॅशन झालीय अशी वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटले. विरोधांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुखर्जी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 11:15 AM IST

अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसचा दिलासा

28 डिसेंबर

दिल्लीत महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणार्‍या महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे खासदार अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसनं दिलासा दिलाय. अभिजीत मुखर्जी यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितल्यानं त्यांच्यावर कारवाईची गरज नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. महिलाविरोधातल्या वाढत्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत मुखर्जी यांनी मेणबत्या मिरवणं ही आज फॅशन झालीय अशी वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटले. विरोधांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुखर्जी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close