S M L

प्रक्षोभक भाषण प्रकरणी ओवेसी अटकेत

08 जानेवारीप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक करण्यात आलीय. ओवेसी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. हॉस्पिटलमध्येच ओवेसींना अटक करण्यात आली. आता त्यांना आदिलाबादकडे नेण्यात येतंय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ओवेसींविरुद्द गुन्हा दाखल झालाय. पण आपली अटक टाळण्यासाठी ओवेसींनी तब्येतीचं कारण दिलं होतं. त्यांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांना अटक करण्यात आली. ओवेसी यांनी मागिल महिन्यात डिसेंबरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर ओवेसीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांना याप्रकरणी विचारपुस करण्यासाठी ओवेसींना स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र ओवेसींनी लंडनवरून परतल्यानंतर तब्येतीच कारण दाखवून उपचारासाठी चार दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली होती. पोलिसांनी आज ओवेसींना शहरातील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट जाहीर केला. ओवेसींच्या उजव्या मांडीत गोळी लागल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ओवेसींना दूर अंतरापर्यंत चालणं अशक्य झालंय. ओवेसींना हर्नियाची समस्या आहे, असंही आता कळतंय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ओवेसींविरूद्ध 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतलीय.ओवैसी यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. मात्र आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच ओवेसींना अटक केलीय. हॉस्पिटलबाहेर मोठ्याप्रमाणावर ओवेसी समर्थकांनी गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 12:27 PM IST

प्रक्षोभक भाषण प्रकरणी ओवेसी अटकेत

08 जानेवारी

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक करण्यात आलीय. ओवेसी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. हॉस्पिटलमध्येच ओवेसींना अटक करण्यात आली. आता त्यांना आदिलाबादकडे नेण्यात येतंय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ओवेसींविरुद्द गुन्हा दाखल झालाय. पण आपली अटक टाळण्यासाठी ओवेसींनी तब्येतीचं कारण दिलं होतं. त्यांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांना अटक करण्यात आली.

ओवेसी यांनी मागिल महिन्यात डिसेंबरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर ओवेसीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांना याप्रकरणी विचारपुस करण्यासाठी ओवेसींना स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र ओवेसींनी लंडनवरून परतल्यानंतर तब्येतीच कारण दाखवून उपचारासाठी चार दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली होती. पोलिसांनी आज ओवेसींना शहरातील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट जाहीर केला. ओवेसींच्या उजव्या मांडीत गोळी लागल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ओवेसींना दूर अंतरापर्यंत चालणं अशक्य झालंय. ओवेसींना हर्नियाची समस्या आहे, असंही आता कळतंय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ओवेसींविरूद्ध 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतलीय.ओवैसी यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. मात्र आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच ओवेसींना अटक केलीय. हॉस्पिटलबाहेर मोठ्याप्रमाणावर ओवेसी समर्थकांनी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close