S M L

दिल्ली गँगरेप :साक्षीदाराचे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळले

05 जानेवारीदिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या मित्राने शुक्रवारी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. फोन केल्यानंतर पोलीस पाऊण तासानंतर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या 3 गाड्या आल्या आणि पोलिसांनी स्टेशनांच्या हद्दीवरून वाद घातला असे आरोप त्यांने केले होते. पण दिल्ली सहपोलीस आयुक्त विवेक गोगिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, पोलीस केवळ 16 मिनिटात घटनास्थळी पोहोचले आणि स्टेशनांच्या हद्दीवरून कुठलाही वाद झाला नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे नसले, तरी आम्ही शक्य ती सर्व मदत केली असंही ते म्हणाले. दरम्यान, या केसची सुनावणी दिल्लीतल्या फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालीये. आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने सर्व आरोपींना 7 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 17 वर्षांच्या बाल गुन्हेगाराच्या खटल्यावर सोमवारी वेगळ्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2013 05:38 PM IST

दिल्ली गँगरेप :साक्षीदाराचे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळले

05 जानेवारी

दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या मित्राने शुक्रवारी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. फोन केल्यानंतर पोलीस पाऊण तासानंतर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या 3 गाड्या आल्या आणि पोलिसांनी स्टेशनांच्या हद्दीवरून वाद घातला असे आरोप त्यांने केले होते. पण दिल्ली सहपोलीस आयुक्त विवेक गोगिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, पोलीस केवळ 16 मिनिटात घटनास्थळी पोहोचले आणि स्टेशनांच्या हद्दीवरून कुठलाही वाद झाला नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे नसले, तरी आम्ही शक्य ती सर्व मदत केली असंही ते म्हणाले. दरम्यान, या केसची सुनावणी दिल्लीतल्या फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालीये. आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने सर्व आरोपींना 7 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 17 वर्षांच्या बाल गुन्हेगाराच्या खटल्यावर सोमवारी वेगळ्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2013 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close