S M L

'ती'ने घेतला अखेरचा श्वास

'ती'ने घेतला अखेरचा श्वास29 डिसेंबरदिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणींनीची मृत्यूशी झुंझ अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजता तीचा मृत्यू झाला. तिला वाचवण्यास डॉक्टरांना अटोकात प्रयत्न केले पण अपयश आलंय. दिल्लीत उपचार सुरू असताना गुरूवारी प्रकृती खालावल्यामुळे सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अवयव प्रत्यारोपणासाठी शरीर साथ देत नव्हते. अखेर शुक्रवारी रात्री डॉक्टरांनी 'नातेवाईकांना बोलावून घ्या' असा अखेरचा निरोप धाडला. रात्री सव्वा दोन वाजता अखेर तिची प्राणज्योत मालावली. तिचं पार्थिव आणण्यासाठी दिल्लीवरून विमान रवाना झाले असून दुपारी तीनच्या सुमारास ते सिंगापूरमध्ये दाखल होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेआठवाजेपर्यंत तिचं पार्थिव भारतात येण्याची शक्यता आहे.दिल्लीत 16 डिसेंबरच्या रात्री आपल्या मित्रासोबत घरी जात असताना चालत्या बसमध्ये तरूणीवर सहा नराधमांनी बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकून दिलं. तरूणीला सफरदगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरू असताना देशभरात बलात्कारविरोधात तीव्र पडसाद उमटले. देशाच्या राजधानी दिल्लीत तरूणाईने इंडिया गेट, राष्ट्रपतीभवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली. पीडित तरूणींच्या प्रकृतीबद्दल केंद्र सरकार नजर ठेवून होतं. दिल्लीत उपचार घेत असताना तरूणीची प्रकृती गंभीर होती पण नातेवाईकांशी ती संवाद साधत होती. मात्र गुरूवारी तरूणीची प्रकृती अचानक खालावली आणि तिला त्याच रात्री एअर ऍब्युलन्सने सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अखेरच्या क्षणी तिच्याजवळ तिचे नातेवाईक आणि भारतीय उच्चायुक्तातले अधिकारी हजर होते. सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासूनच तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या आठ स्पेशालिस्ट डॉक्टर्सची टीम तिच्या उपचारार्थ नेमण्यात आली होती. तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र गेल्या दोन दिवसांत तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे तिच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना तिला दोन हार्ट ऍटॅक आले होते, काल पुन्हा तिला हार्ट ऍटॅक आला. काल श्वास घेता यावा, म्हणून जास्तीत जास्त व्हेंटिलेशनची मदत तिला देण्यात आली होती. तिच्या मेंदूलाही दुखापत झाल्याचं उपचारादरम्यान निदर्शनास आलं. तिचं पार्थिव आज भारतात आणलं जाईल अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2012 05:28 PM IST

'ती'ने घेतला अखेरचा श्वास

'ती'ने घेतला अखेरचा श्वास29 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणींनीची मृत्यूशी झुंझ अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजता तीचा मृत्यू झाला. तिला वाचवण्यास डॉक्टरांना अटोकात प्रयत्न केले पण अपयश आलंय. दिल्लीत उपचार सुरू असताना गुरूवारी प्रकृती खालावल्यामुळे सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अवयव प्रत्यारोपणासाठी शरीर साथ देत नव्हते. अखेर शुक्रवारी रात्री डॉक्टरांनी 'नातेवाईकांना बोलावून घ्या' असा अखेरचा निरोप धाडला. रात्री सव्वा दोन वाजता अखेर तिची प्राणज्योत मालावली. तिचं पार्थिव आणण्यासाठी दिल्लीवरून विमान रवाना झाले असून दुपारी तीनच्या सुमारास ते सिंगापूरमध्ये दाखल होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेआठवाजेपर्यंत तिचं पार्थिव भारतात येण्याची शक्यता आहे.

दिल्लीत 16 डिसेंबरच्या रात्री आपल्या मित्रासोबत घरी जात असताना चालत्या बसमध्ये तरूणीवर सहा नराधमांनी बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकून दिलं. तरूणीला सफरदगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरू असताना देशभरात बलात्कारविरोधात तीव्र पडसाद उमटले. देशाच्या राजधानी दिल्लीत तरूणाईने इंडिया गेट, राष्ट्रपतीभवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली. पीडित तरूणींच्या प्रकृतीबद्दल केंद्र सरकार नजर ठेवून होतं. दिल्लीत उपचार घेत असताना तरूणीची प्रकृती गंभीर होती पण नातेवाईकांशी ती संवाद साधत होती. मात्र गुरूवारी तरूणीची प्रकृती अचानक खालावली आणि तिला त्याच रात्री एअर ऍब्युलन्सने सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

अखेरच्या क्षणी तिच्याजवळ तिचे नातेवाईक आणि भारतीय उच्चायुक्तातले अधिकारी हजर होते. सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासूनच तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या आठ स्पेशालिस्ट डॉक्टर्सची टीम तिच्या उपचारार्थ नेमण्यात आली होती. तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र गेल्या दोन दिवसांत तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे तिच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना तिला दोन हार्ट ऍटॅक आले होते, काल पुन्हा तिला हार्ट ऍटॅक आला. काल श्वास घेता यावा, म्हणून जास्तीत जास्त व्हेंटिलेशनची मदत तिला देण्यात आली होती. तिच्या मेंदूलाही दुखापत झाल्याचं उपचारादरम्यान निदर्शनास आलं. तिचं पार्थिव आज भारतात आणलं जाईल अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2012 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close