S M L

गोळीबार केल्यास जशास तसे उत्तर देऊ -लष्करप्रमुख

14 जानेवारीपाकिस्तानचं कृत्य माफीच्या लायक नाही. पाकिस्ताननं यानंतर उकसवण्याचा प्रयत्न केला तर भारत जशास तसे उत्तर देईल असा कडक इशारा लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी दिलाय. तसंच पाकिस्ताननं शहीद हेमराज यांचं शीर परत करावं असं आवाहनही सिंग यांनी केलं. ब्रिगेडियर स्तरावर आज बैठक पार पडलीय या बैठकी अगोदर बिक्रम सिंग पत्रकार परिषदेत बोलत होते. चुरंडा गावात पाकिस्तानी सैनिकांचा दबदबा आहे. भारतीय सैनिकांनी 6 जानेवारीला पाकवर हल्ला केला नाही. त्यांचा आरोप खोटा आहे. उलट पाक सैनिकांनी दुसर्‍या दिवशी 7 जानेवारीला पूँछमध्ये गोळीबार केला आणि दोन जवानांची हत्या केली. या दोन्ही घटना हा पाकिस्तानाचा डाव आहे. त्यांनी केलेल्या गोळीबार नियोजनबध्द होता अशा ऑपरेशनसाठी अगोदर मोठी तयारी करावी लागते. पाकिस्तानने अगोदरच याची तयारी केली असावी असा आरोपही बिक्रम सिंग यांनी केला. आम्ही जवानांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे जर पाककडून गोळीबार झाला तर तसेच उत्तर द्यावे पण आपण युद्धविरामाचा आदर राखतो. पाकिस्ताननेही युद्धविरामाचा आदर राखावा अन्यथा पाकला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही सिंग यांनी दिला. शहीद जवानांच्या मृत्यूचे दुख आहे. तो आमच्या परिवाराचाच एक भाग आहे ज्या सुविधा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळतात त्या देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असंही सिंग यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2013 09:58 AM IST

गोळीबार केल्यास जशास तसे उत्तर देऊ -लष्करप्रमुख

14 जानेवारी

पाकिस्तानचं कृत्य माफीच्या लायक नाही. पाकिस्ताननं यानंतर उकसवण्याचा प्रयत्न केला तर भारत जशास तसे उत्तर देईल असा कडक इशारा लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी दिलाय. तसंच पाकिस्ताननं शहीद हेमराज यांचं शीर परत करावं असं आवाहनही सिंग यांनी केलं. ब्रिगेडियर स्तरावर आज बैठक पार पडलीय या बैठकी अगोदर बिक्रम सिंग पत्रकार परिषदेत बोलत होते.

चुरंडा गावात पाकिस्तानी सैनिकांचा दबदबा आहे. भारतीय सैनिकांनी 6 जानेवारीला पाकवर हल्ला केला नाही. त्यांचा आरोप खोटा आहे. उलट पाक सैनिकांनी दुसर्‍या दिवशी 7 जानेवारीला पूँछमध्ये गोळीबार केला आणि दोन जवानांची हत्या केली. या दोन्ही घटना हा पाकिस्तानाचा डाव आहे. त्यांनी केलेल्या गोळीबार नियोजनबध्द होता अशा ऑपरेशनसाठी अगोदर मोठी तयारी करावी लागते. पाकिस्तानने अगोदरच याची तयारी केली असावी असा आरोपही बिक्रम सिंग यांनी केला. आम्ही जवानांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे जर पाककडून गोळीबार झाला तर तसेच उत्तर द्यावे पण आपण युद्धविरामाचा आदर राखतो. पाकिस्ताननेही युद्धविरामाचा आदर राखावा अन्यथा पाकला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही सिंग यांनी दिला. शहीद जवानांच्या मृत्यूचे दुख आहे. तो आमच्या परिवाराचाच एक भाग आहे ज्या सुविधा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळतात त्या देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असंही सिंग यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2013 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close