S M L

'बालक' आणि 'पालकां'नी जरूर पाहावा असा !(समिक्षा)

अमोल परचुरे, समिक्षक04 जानेवारीहल्लीची पिढी खूप स्मार्ट झालीये असं आपण वरचेवर ऐकत असतो. हीच गोष्ट आपल्या पाल्यांबद्दल पालकही खूप कौतुकानं सांगत असतात, पण याच स्मार्ट पिढीनं आपलं कुतूहल शमवण्यासाठी अडचणीचे वाटतील असे प्रश्न विचारले तर त्यांची तोंडं बंद केली जातात. हे आत्ताच नाही तर वर्षानुवर्ष घडतंय. हीच ती वेळ असते जेव्हा ही मुलं आपलं कुतूहल शमवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्याचवेळी आपल्या पालकांपासून लांब जात असतात. या मुलांना मग वाईट संगती लागते आणि पालक मात्र आपली मुलं हुशार आहेत, ती कोणतंही वेडंवाकडं काम करूच शकत नाहीत या भ्रमात राहतात. अशाच चार बालकांची आणि त्यांच्या पालकांची गोष्ट आहे बालक पालक या सिनेमात. सिनेमाचा काळ आहे 1983 चा. पण बालक आणि पालक यांच्यातील विसंवाद आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या आजही कायम आहे, आणि म्हणूनच हा सिनेमात आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. शाळेत मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जावं की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. तो होईल तेव्हा होईल पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पालकांनी मित्र बनून आपल्या मुलांशी सुसंवाद साधणं, नाहीतर काय होऊ शकतं ते बालक पालकमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बालक पालक हा अभिनेता रितेश देशमुखचा निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा, बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच तीन जानेवारी 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून रितेशनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि दहा वर्षात तो निर्माता बनलाय. दिग्दर्शक रवी जाधव यांचा नटरंग आणि बालगंधर्व यानंतरचा हा तिसरा सिनेमा. त्यांच्या दिग्दर्शनाची खास वैशिष्टयं इथेही ठळकपणे दिसतात. विषय धाडसी आणि नाजूक असला तरी कुठेही तो बटबटीत होणार नाही किंवा त्याचं उदात्तीकरण होणार नाही याची पूर्ण काळजी रवी जाधव यांच्यातल्या दिग्दर्शकानं आणि लेखक जोडी गणेश पंडित-अंबर हडप यांनी घेतलेली आहे. कथा पुढे नेण्यासाठी किंवा काही उदाहरणं सांगण्यासाठी याही सिनेमात रवी जाधव यांनी मोन्टाजचा सुंदर वापर केलाय. मुख्य म्हणजे हा सिनेमा एका एकांकिकेवर बेतलेला असला तरी ही पूर्णपणे वेगळी कलाकृती वाटेल यावर खास मेहनत घेण्यात आलेली आहे. तांत्रिकदृष्टया जे प्रयत्न करण्यात आलेत, वेगळे प्रयोग करण्यात आलेत ते सिनेमाच्या परिणामकारकतेत भर टाकणारे आहेत. प्रेक्षकांना एक सहजसुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न नटरंग आणि बालगंधर्वसारखाच इथेही दिसतो. बालक पालक मधील सर्वच कलाकार आणि खास करून लहान मुलांनी अप्रतिमच अभिनय केलाय. पण या लहान मुलांना विषय समजावून सांगणं, त्यानुसार अभिनय करून घेणं, त्या त्या सीन्समध्ये त्यांचे अचूक हावभाव टिपणं हे आव्हान रवी जाधव आणि त्यांच्या टीमनं यशस्वीपणे पार करुन दाखवलंय.या सिनेमात सर्वात उल्लेखनीय काम केलंय ते मुलांनी...मदन देवधर, शाश्वती पिंपळीकर, भाग्यश्री सकपाळ,रोहित फाळके आणि प्रथमेश परब यांनी जो अभिनय केलाय तो एकदम नैसर्गिक आहे. कुठेही आगाऊपणा नाही किंवा कुठेही कृत्रिमपणा नाही...पालकांच्या रोलमध्ये मोठ्या कलाकारांनी चांगली साथ दिलीय. पण यातही पुन्हा एकदा कमाल केलीये ती किशोर कदम यांनी. रवी जाधव यांच्यासोबत हा सौमित्रचा तिसरा सिनेमा. आता तुलना करू नये पण या तीन सिनेमांमध्ये बालक पालक मधला त्यांचा रोल आणि त्यांचा अभिनय सिनेमाच्या इम्पॅक्टसाठी खूपच महत्त्वाचा ठरलाय. रवी जाधवच्या सिनेमाचं संगीत हासुध्दा महत्त्वाचा भाग असतो हे आता पुन्हा एकदा सिध्द झालंय. नटरंग, बालगंधर्व आणि आता बालक पालक, यावेळी तर विशाल-शेखरने मराठीत दमदार एंट्री केलेली आहे. त्यांच्या म्युझिकने एकदम कल्ला केलाय आणि त्यांना तशीच 'कल्ला' साथ दिलीये ती चिनार-महेश या संगीतकार जोडीनं. चिनार-महेश यांचं पार्श्वसंगीतसुध्दा एकदम खणखणीत झालंय. महेश लिमयेच्या कॅमेरानंसुध्दा कमाल केली आहे. एकूण काय, मी आधी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्यायत. सध्या देशात ज्या प्रनावरून जोरदार आंदोलनं आणि चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर बालक-पालक हा सिनेमा आणखी महत्त्वाचा ठरतो. लैंगिक भावना चालवणार्‍या बॉलीवूड सिनेमांना दोषही सध्या दिला जातोय. पण बॉलीवूडमध्ये पॉर्नस्टारना घेऊन उत्तान आणि अर्थहीन सिनेमे बनवणार्‍या महारथींना या बालक-पालक या सिनेमानं एक सणसणीत उत्तर दिलेलं आहे. सिनेमा हे लोकरंजनाचं माध्यम आहेच पण ते लोकशिक्षणाचंसुध्दा माध्यम आहे हे पटवून देणारा सिनेमा म्हणजे बालक-पालक... असं आणखी या सिनेमाबद्दल बरंच काही आहे पण प्रत्येक बालक आणि पालक यांनी एकत्र बसून बघावा असाच हा सिनेमा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2013 01:13 PM IST

'बालक' आणि 'पालकां'नी जरूर पाहावा असा !(समिक्षा)

अमोल परचुरे, समिक्षक

04 जानेवारी

हल्लीची पिढी खूप स्मार्ट झालीये असं आपण वरचेवर ऐकत असतो. हीच गोष्ट आपल्या पाल्यांबद्दल पालकही खूप कौतुकानं सांगत असतात, पण याच स्मार्ट पिढीनं आपलं कुतूहल शमवण्यासाठी अडचणीचे वाटतील असे प्रश्न विचारले तर त्यांची तोंडं बंद केली जातात. हे आत्ताच नाही तर वर्षानुवर्ष घडतंय. हीच ती वेळ असते जेव्हा ही मुलं आपलं कुतूहल शमवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्याचवेळी आपल्या पालकांपासून लांब जात असतात. या मुलांना मग वाईट संगती लागते आणि पालक मात्र आपली मुलं हुशार आहेत, ती कोणतंही वेडंवाकडं काम करूच शकत नाहीत या भ्रमात राहतात. अशाच चार बालकांची आणि त्यांच्या पालकांची गोष्ट आहे बालक पालक या सिनेमात.

सिनेमाचा काळ आहे 1983 चा. पण बालक आणि पालक यांच्यातील विसंवाद आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या आजही कायम आहे, आणि म्हणूनच हा सिनेमात आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. शाळेत मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जावं की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. तो होईल तेव्हा होईल पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पालकांनी मित्र बनून आपल्या मुलांशी सुसंवाद साधणं, नाहीतर काय होऊ शकतं ते बालक पालकमध्ये आपल्याला बघायला मिळतं.

बालक पालक हा अभिनेता रितेश देशमुखचा निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा, बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच तीन जानेवारी 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून रितेशनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि दहा वर्षात तो निर्माता बनलाय. दिग्दर्शक रवी जाधव यांचा नटरंग आणि बालगंधर्व यानंतरचा हा तिसरा सिनेमा. त्यांच्या दिग्दर्शनाची खास वैशिष्टयं इथेही ठळकपणे दिसतात. विषय धाडसी आणि नाजूक असला तरी कुठेही तो बटबटीत होणार नाही किंवा त्याचं उदात्तीकरण होणार नाही याची पूर्ण काळजी रवी जाधव यांच्यातल्या दिग्दर्शकानं आणि लेखक जोडी गणेश पंडित-अंबर हडप यांनी घेतलेली आहे.

कथा पुढे नेण्यासाठी किंवा काही उदाहरणं सांगण्यासाठी याही सिनेमात रवी जाधव यांनी मोन्टाजचा सुंदर वापर केलाय. मुख्य म्हणजे हा सिनेमा एका एकांकिकेवर बेतलेला असला तरी ही पूर्णपणे वेगळी कलाकृती वाटेल यावर खास मेहनत घेण्यात आलेली आहे. तांत्रिकदृष्टया जे प्रयत्न करण्यात आलेत, वेगळे प्रयोग करण्यात आलेत ते सिनेमाच्या परिणामकारकतेत भर टाकणारे आहेत. प्रेक्षकांना एक सहजसुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न नटरंग आणि बालगंधर्वसारखाच इथेही दिसतो. बालक पालक मधील सर्वच कलाकार आणि खास करून लहान मुलांनी अप्रतिमच अभिनय केलाय. पण या लहान मुलांना विषय समजावून सांगणं, त्यानुसार अभिनय करून घेणं, त्या त्या सीन्समध्ये त्यांचे अचूक हावभाव टिपणं हे आव्हान रवी जाधव आणि त्यांच्या टीमनं यशस्वीपणे पार करुन दाखवलंय.

या सिनेमात सर्वात उल्लेखनीय काम केलंय ते मुलांनी...मदन देवधर, शाश्वती पिंपळीकर, भाग्यश्री सकपाळ,रोहित फाळके आणि प्रथमेश परब यांनी जो अभिनय केलाय तो एकदम नैसर्गिक आहे. कुठेही आगाऊपणा नाही किंवा कुठेही कृत्रिमपणा नाही...पालकांच्या रोलमध्ये मोठ्या कलाकारांनी चांगली साथ दिलीय. पण यातही पुन्हा एकदा कमाल केलीये ती किशोर कदम यांनी. रवी जाधव यांच्यासोबत हा सौमित्रचा तिसरा सिनेमा. आता तुलना करू नये पण या तीन सिनेमांमध्ये बालक पालक मधला त्यांचा रोल आणि त्यांचा अभिनय सिनेमाच्या इम्पॅक्टसाठी खूपच महत्त्वाचा ठरलाय.

रवी जाधवच्या सिनेमाचं संगीत हासुध्दा महत्त्वाचा भाग असतो हे आता पुन्हा एकदा सिध्द झालंय. नटरंग, बालगंधर्व आणि आता बालक पालक, यावेळी तर विशाल-शेखरने मराठीत दमदार एंट्री केलेली आहे. त्यांच्या म्युझिकने एकदम कल्ला केलाय आणि त्यांना तशीच 'कल्ला' साथ दिलीये ती चिनार-महेश या संगीतकार जोडीनं. चिनार-महेश यांचं पार्श्वसंगीतसुध्दा एकदम खणखणीत झालंय. महेश लिमयेच्या कॅमेरानंसुध्दा कमाल केली आहे. एकूण काय, मी आधी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्यायत.

सध्या देशात ज्या प्रनावरून जोरदार आंदोलनं आणि चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर बालक-पालक हा सिनेमा आणखी महत्त्वाचा ठरतो. लैंगिक भावना चालवणार्‍या बॉलीवूड सिनेमांना दोषही सध्या दिला जातोय. पण बॉलीवूडमध्ये पॉर्नस्टारना घेऊन उत्तान आणि अर्थहीन सिनेमे बनवणार्‍या महारथींना या बालक-पालक या सिनेमानं एक सणसणीत उत्तर दिलेलं आहे. सिनेमा हे लोकरंजनाचं माध्यम आहेच पण ते लोकशिक्षणाचंसुध्दा माध्यम आहे हे पटवून देणारा सिनेमा म्हणजे बालक-पालक... असं आणखी या सिनेमाबद्दल बरंच काही आहे पण प्रत्येक बालक आणि पालक यांनी एकत्र बसून बघावा असाच हा सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2013 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close