S M L

'वुई वॉन्ट अवर सिंघम, बॅक वसंत ढोबळे'

14 जानेवारी'हॉकी कॉप' एसीपी वसंत ढोबळे यांच्या तडकाफडकी बदलीच्या विरोधात स्थानिक रस्त्यावर उतरले आहे. वसंत ढोबळे यांची बदली रद्द करण्यासाठी रविवारी वाकोला परिसरातील स्थानिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून घेराव घातला. वुई वॉन्ट ढोबळे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शुक्रवारी वाकोला भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना मदन जैसवाल यांचं बेकायदेशीर असलेलं दुकानं हटवताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी ढोबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ढोबळे यांची बदली काँग्रेस नेत्यांच्या दबावापोटी करण्यात आलीय असा आरोप शिवेसनेनं केलाय. पण ढोबळेंवर झालेली ही कारवाई योग्य असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. वसंत ढोबळे या अगोदर समाजसेवा शाखेत असताना पब, बार, हुक्कापार्लरवर धडक कारवाईमुळे वादात सापडले होते. ढोबळेंच्या कारवाईमुळे त्यांना 'हॉकी कॉप' असंही म्हटलं जातं होतं. मात्र ढोबळेंच्या कारवाईमुळे 'पब संस्कृती' धोक्यात आलीय असा आरोप करून उच्चवर्गियांनी ढोबळेंच्या विरोध आंदोलनं केली होती. तर दुसरीकडे अनेकांनी ढोबळेंच्या कारवाईचं समर्थनही केलं होतं. आताही ढोबळेंच्या कारवाईमुळे हाच तिढा निर्माण झालाय. शिवसेना,मनसे पक्षासह स्थानिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2013 11:21 AM IST

'वुई वॉन्ट अवर सिंघम, बॅक वसंत ढोबळे'

14 जानेवारी

'हॉकी कॉप' एसीपी वसंत ढोबळे यांच्या तडकाफडकी बदलीच्या विरोधात स्थानिक रस्त्यावर उतरले आहे. वसंत ढोबळे यांची बदली रद्द करण्यासाठी रविवारी वाकोला परिसरातील स्थानिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून घेराव घातला. वुई वॉन्ट ढोबळे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शुक्रवारी वाकोला भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना मदन जैसवाल यांचं बेकायदेशीर असलेलं दुकानं हटवताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी ढोबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ढोबळे यांची बदली काँग्रेस नेत्यांच्या दबावापोटी करण्यात आलीय असा आरोप शिवेसनेनं केलाय. पण ढोबळेंवर झालेली ही कारवाई योग्य असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. वसंत ढोबळे या अगोदर समाजसेवा शाखेत असताना पब, बार, हुक्कापार्लरवर धडक कारवाईमुळे वादात सापडले होते. ढोबळेंच्या कारवाईमुळे त्यांना 'हॉकी कॉप' असंही म्हटलं जातं होतं. मात्र ढोबळेंच्या कारवाईमुळे 'पब संस्कृती' धोक्यात आलीय असा आरोप करून उच्चवर्गियांनी ढोबळेंच्या विरोध आंदोलनं केली होती. तर दुसरीकडे अनेकांनी ढोबळेंच्या कारवाईचं समर्थनही केलं होतं. आताही ढोबळेंच्या कारवाईमुळे हाच तिढा निर्माण झालाय. शिवसेना,मनसे पक्षासह स्थानिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2013 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close