S M L

मुंबई हल्ल्याच्या तपासाचे धागेदोरे पश्चिम बंगालपर्यंत

5 डिसेंबर, पश्चिम बंगालतोरल वारिया, सौगता मुखोपाध्यायमुंबई हल्ल्याच्या तपासाचे धागेदोरे पश्चिम बंगालपर्यंत पोचलेत. अतिरेक्यांनी कोलकात्यामधून महिन्याभरापूर्वी किमान तीन सिम कार्ड्स खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. हे कार्ड्स नंतर बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. या तिन्ही सिमचा मुंबई हल्ल्यावेळी वापर करण्यात आला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाला हुजी या अतिरेकी संघटनेनं मदत केल्याचा संशय तपास पथकांना वाटतोय. मुंबई हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग असल्याची शक्यता मुंबईचे पोलीस कमीशनर हसन गफूर यांनी धुडकावून लावलीय. पण, तपासाचे धागेदोरे तपास यंत्रणेला पश्चिम बंगालपर्यंत घेऊन जातायत. अतिरेक्यांना इथून मदत मिळाल्याचे खात्रीलायक सुगावे मिळाले आहेत.अतिरेक्यांकडून सहा सिम कार्ड्स आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. यापैकी तीन दिल्लीतल्या करोल बागेतून खरेदी करण्यात आले होते. तर इतर तीन कोलकातातल्या मिर्झा गालीब मार्ग आणि महेशतळा इथून खरेदी करण्यात आले होते. पश्चिम बंगालमधून आणखी सात सिमची खरेदी झाली होती. पण त्यांचा वापर केला गेला नाही. हे सर्व सिम्स हुसेन-उर-रहमान याच्या नावावर आहेत. आणि सप्टेंबरच्या मध्यंतरात त्याची खरेदी झालीय. रहमानचं घर भारत-बांग्लादेशच्या सीमेवरच्या बसिर्‍हात गावात आहे. विशेष म्हणजे, मुंबई हल्ला होण्याच्या आसपासच गुप्तचर संस्थांनी हुजी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा इशारा दिला होता. बंगाल पोलिसांना त्रिपुरा पोलिसांकडून हुजी अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाली होती. त्याचबरोबर कोलकातावर संभावित हल्ल्यासंदर्भातलं मोबाईल संभाषण कोलकाता पोलिसांनी नुकतंच टॅप केलं होतं. दरम्यान कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या रियाझुद्दीन नसीर उर्फ मोहम्मद गौसची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्यातला अतिरेकी मोहम्मद अजबल कसाबनं जिथून ट्रेनिंग घेतलीय, तिथूनच गौसनंही ट्रेनिंग घेतलीय. अजमलंनं याबाबत कबुली दिली नाहीय. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, स्थानिकांच्या मदतीशिवाय इतका धाडसी हल्ला होणं शक्य नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 06:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 06:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close