S M L

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, LOCवर गोळीबाराचा नोंदवला निषेध

11 जानेवारीभारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर झालेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. त्यांनंतर तिसर्‍या दिवशीही पाक सैनिकांकडून गोळीबार सुरू होता. या गोळीबारात पाकचा एक सैनिक ठार झाला असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या घटनेचा पाकने निषेध व्यक्त केलाय.आज पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना तातडीनं बोलावलं. काल भारत-पाक सीमारेषेवर काल एका पाकिस्तानी जवानाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तान सरकारनं भारतीय उच्चायुक्त शरद सभरवाल यांना बोलवलं होतं. पँूछमधील चाकण दा बाग पोस्टवरील व्यापार सलग दुसर्‍या दिवशीही बंदच आहे. आणि त्यामुळे सीमारेषेवर भारतीय बाजूनं ट्रकच्या रांग लागली आहे. भारतीय सरकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारपासून चाकण दा बाग पोस्टवर व्यापार सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र श्रीनगर-मुझफराबाद या मार्गावर व्यापार सुरळीत सुरू आहे. दरम्यान, भारत-पाक सीमारेषेवरील प्रकरणात तिसरा पक्ष म्हणून हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची मागणी अमेरिकेने फेटाळलीयं. दोन्ही देशांनी परस्पर चर्चेने हा प्रश्न सोडवावा असंही अमेरिकेनं स्पष्ट केलंय

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2013 12:26 PM IST

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, LOCवर गोळीबाराचा नोंदवला निषेध

11 जानेवारी

भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर झालेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. त्यांनंतर तिसर्‍या दिवशीही पाक सैनिकांकडून गोळीबार सुरू होता. या गोळीबारात पाकचा एक सैनिक ठार झाला असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या घटनेचा पाकने निषेध व्यक्त केलाय.आज पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना तातडीनं बोलावलं. काल भारत-पाक सीमारेषेवर काल एका पाकिस्तानी जवानाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तान सरकारनं भारतीय उच्चायुक्त शरद सभरवाल यांना बोलवलं होतं. पँूछमधील चाकण दा बाग पोस्टवरील व्यापार सलग दुसर्‍या दिवशीही बंदच आहे. आणि त्यामुळे सीमारेषेवर भारतीय बाजूनं ट्रकच्या रांग लागली आहे. भारतीय सरकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारपासून चाकण दा बाग पोस्टवर व्यापार सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र श्रीनगर-मुझफराबाद या मार्गावर व्यापार सुरळीत सुरू आहे. दरम्यान, भारत-पाक सीमारेषेवरील प्रकरणात तिसरा पक्ष म्हणून हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची मागणी अमेरिकेने फेटाळलीयं. दोन्ही देशांनी परस्पर चर्चेने हा प्रश्न सोडवावा असंही अमेरिकेनं स्पष्ट केलंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2013 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close