S M L

विलासरावांवर मराठवाड्यातली जनता नाराज

5 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकडमुख्यमंत्री विलासराव देशमुखांना अखेर पदावरून जावं लागलं. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे, असा दावा ते पुन्हापुन्हा करतायत. पण परिस्थिती वेगळीच आहे. मराठवाड्यातल्या लोकांनाही त्यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या. पण लातूरच्या या मुख्यमंत्र्यांवर मराठवाड्यातले लोक नाराज आहेत. विलासराव देशमुख दोन वेळा मुख्यमंत्री झाले. मराठवाड्याच्या लोकांना या लातूरच्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण एकूणच देशमुखांबद्दल मराठवाड्याचा भ्रमनिरास झालाय. " विकास ही एक राजकीय इच्छाशक्तीची प्रक्रिया असते. विलासरावांना चांगली संधी होती. शंकरराव चव्हाण यांनी वैधानिक विकास मंडळांना विरोध केला. पण खूप कामं केली. कारण त्यांना विकास मंडळ खूळखुळा वाटायची. विलासरावांच्या कार्यकालात वैधानिक विकास मंडळ होती"विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यात नेहमी रस्त्यांचा विकास आणि सिंचनाच्या कामांच्या बैठका तर घेतल्या पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी घोषणा केल्या. औरंगाबाद शहराला टॉप टेन शहरात आणणार पण टॉप टेन तर दूरच, पण शहराची शेवटच्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे. मराठवाड्याच्या वाट्याचं कृष्णा खोर्‍याचं पाणी देण्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला पण कामाचे प्रस्तावच तयार नाहीत. मराठवाड्याचं 2006 मधलं पॅकेजची पूर्ण झालं नाही त्यामुळे 2007 च्या पॅकेजची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. नंतर 2008- 2009 साठी पुन्हा मागच्याच पॅकेजमधल्या योजनांचा समावेश करण्यात येणार होता. तेही झालं नाही. केंद्र सरकारचा निधी आणि वीज मंडळाच्या योजनांचाही यात समावेश करण्यात येणार होता. पण लोडशेडिंगच्या अंधारापलीकडे मराठवाड्यात काहीच नाही. विलासरावांच्या रूपानं मराठवाड्याला आठ वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतु त्यांच्या कार्यकालात जाहीर झालेल्या योजनांची क्वचितच अंमलबजावणी झाली. त्यामुळं विलासरावांची कारकीर्द मराठवाड्यासाठी लाभदायी ठरली नाही. तरीही विलासराव देशमुख मराठवाड्यासाठी खूप काही केल्याची भाषा करतायत. "नद्यांवर बॅरेज बांधण्याची कामं हाती घेतली. तालुका स्तरापर्यंत रस्ते विकासाची कामं झाली" असं सांगत ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. पण एकूणच विलासरावांना स्वत:चं ठोस काम सांगता आलं नाही. मराठवाड्याच्या पदरी निराशा एवढ्याच शब्दात विलासरावांच्या कारकिर्दीचं वर्णन करता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 06:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 06:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close