S M L

'मला भारतीय असल्याचा गर्व आहे, मी सुरक्षित आहे'

29 जानेवारीमला भारतीय असल्याचा गर्व आहे, मी भारतात पुर्णपणे सुरक्षित आहे, या देशातून मला खूप प्रेम मिळाले आहे. अगोदर माझी मुलाखत नीट वाचवी. मी काय बोललो हे समजून घ्या. काय वाचले आणि काहीही समजून हा वाद विनाकारण घातला जात आहे अशी सणसणीत चपराक अभिनेता शाहरूख खानने पाकच्या गृहमंत्र्यांना आणि दहशतवादी हाफीज सईदला लगावली आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादावर शाहरूख खानने आपली प्रतिक्रिया दिली. आऊटलूक या मासिकात शाहरूख खानची मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत शाहरूखने अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर तेथिल मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी अमेरिकेत एक मुस्लिम आहे म्हणून संशयाने पाहिलं जातं. माझ्यावरही असे आरोप झाले. ' एक भारतीय असून सुद्धा ज्या देशांच्या स्वातंत्र्यांसाठी राष्ट्रपितांनी लढा दिला. त्या देशात माझ्यावर राजकारण्यांनी असे आरोप करून असं भासवलं की, मी शेजारच्या देशात जाऊन राहावं. तेच माझं खरं घर आहे' असं मत शाहरूखने आपल्या मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पण त्याच्या या वक्तव्याचा 'पाकिस्तानी स्टाईलने' अर्थ काढून दहशतवादी हाफीज सईदने थेट निमंत्रणचं दिलं. हे होत नाही तेच पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी शाहरूखला संरक्षण द्यावं असा आगाऊ सल्ला देऊन टाकला. मात्र भारताने आपल्या नागरिकाच्या संरक्षणासाठी समर्थ आहे असा कडक शब्दात उत्तर धाडलं. आज संध्याकाळी खुद्द शाहरूख खानने भारताचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असं सांगून वादावर पडदा टाकला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 05:32 PM IST

'मला भारतीय असल्याचा गर्व आहे, मी सुरक्षित आहे'

29 जानेवारी

मला भारतीय असल्याचा गर्व आहे, मी भारतात पुर्णपणे सुरक्षित आहे, या देशातून मला खूप प्रेम मिळाले आहे. अगोदर माझी मुलाखत नीट वाचवी. मी काय बोललो हे समजून घ्या. काय वाचले आणि काहीही समजून हा वाद विनाकारण घातला जात आहे अशी सणसणीत चपराक अभिनेता शाहरूख खानने पाकच्या गृहमंत्र्यांना आणि दहशतवादी हाफीज सईदला लगावली आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादावर शाहरूख खानने आपली प्रतिक्रिया दिली.

आऊटलूक या मासिकात शाहरूख खानची मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत शाहरूखने अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर तेथिल मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी अमेरिकेत एक मुस्लिम आहे म्हणून संशयाने पाहिलं जातं. माझ्यावरही असे आरोप झाले. ' एक भारतीय असून सुद्धा ज्या देशांच्या स्वातंत्र्यांसाठी राष्ट्रपितांनी लढा दिला. त्या देशात माझ्यावर राजकारण्यांनी असे आरोप करून असं भासवलं की, मी शेजारच्या देशात जाऊन राहावं. तेच माझं खरं घर आहे' असं मत शाहरूखने आपल्या मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पण त्याच्या या वक्तव्याचा 'पाकिस्तानी स्टाईलने' अर्थ काढून दहशतवादी हाफीज सईदने थेट निमंत्रणचं दिलं. हे होत नाही तेच पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी शाहरूखला संरक्षण द्यावं असा आगाऊ सल्ला देऊन टाकला. मात्र भारताने आपल्या नागरिकाच्या संरक्षणासाठी समर्थ आहे असा कडक शब्दात उत्तर धाडलं. आज संध्याकाळी खुद्द शाहरूख खानने भारताचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असं सांगून वादावर पडदा टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close