S M L

शिवसेनेला खिंडार,बागुल राष्ट्रवादीत

14 जानेवारीराज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस सुरू असलेली दिसतेय. आज नाशिक शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल हे त्यांच्या समर्थक त्यांच्यासह माजी महानगरप्रमुख अर्जुन टीळे आणि शोभा मगर यांच्यासह आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. बागुल यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. बागुल यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्यास संजय राऊत यांना जबाबदार धरलं आहे. नाशिकबाबत कोणतेचे योग्य निर्णय घेतले जात नाही. कोणीही येतो आणि कोणत्याही पदावर बसतोय. आम्ही सांगितलेली माणसं नाकारली जात होती आणि जी माणसं संजय राऊत यांची पंटर बनतील अशाच माणसांना न्याय मिळायतोय असा आरोपही बागुल यांनी केला. तर तिकडे कोल्हापुरात आज संपर्कनेते दिवाकर रावते यांच्या विरोधातच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. स्थानिक आमदार राजेश शिरसाट यांनाच पक्षाचं झुकतं माप असतं, असा आरोप संजय पवार यांनी केलाय. संजय पवार यांच्या गटानं जिल्हा कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तिथं दिवाकर रावतेंच्या नावानं निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला. तर तळकोकणात शिवसेनेचा भक्कम नेता समजले जाणारे परशुराम उपरकर हेही आता मनसेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. त्या गोष्टीला त्यांनी स्वतः दुजोरा दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2013 12:51 PM IST

शिवसेनेला खिंडार,बागुल राष्ट्रवादीत

14 जानेवारी

राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस सुरू असलेली दिसतेय. आज नाशिक शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल हे त्यांच्या समर्थक त्यांच्यासह माजी महानगरप्रमुख अर्जुन टीळे आणि शोभा मगर यांच्यासह आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

बागुल यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. बागुल यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्यास संजय राऊत यांना जबाबदार धरलं आहे. नाशिकबाबत कोणतेचे योग्य निर्णय घेतले जात नाही. कोणीही येतो आणि कोणत्याही पदावर बसतोय. आम्ही सांगितलेली माणसं नाकारली जात होती आणि जी माणसं संजय राऊत यांची पंटर बनतील अशाच माणसांना न्याय मिळायतोय असा आरोपही बागुल यांनी केला.

तर तिकडे कोल्हापुरात आज संपर्कनेते दिवाकर रावते यांच्या विरोधातच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. स्थानिक आमदार राजेश शिरसाट यांनाच पक्षाचं झुकतं माप असतं, असा आरोप संजय पवार यांनी केलाय. संजय पवार यांच्या गटानं जिल्हा कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तिथं दिवाकर रावतेंच्या नावानं निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला. तर तळकोकणात शिवसेनेचा भक्कम नेता समजले जाणारे परशुराम उपरकर हेही आता मनसेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. त्या गोष्टीला त्यांनी स्वतः दुजोरा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2013 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close