S M L

'लोकपाल'ला अण्णांचा विरोध,बेदींचा पाठिंबा

01 फेब्रुवारीअण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या सुधारीत मसुद्याला विरोध केला आहे. सरकारनं सर्व देशाची फसवणूक केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. टीम अण्णांनी, देशातल्या इतर संस्थांनी केलेल्या कुठल्याही सुचनांचा या मसुद्यात समावेश करण्यात आलेला नाही. सरकारनं स्वत:चा मसुदा स्वत: तयार केला आहे. या जनलोकपालच्या विरोधात पुढचे दीड वर्ष देशभर जनजागृती करणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. तसंच गरज पडली तर पुन्हा एकदा रामलीलावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे. मात्र एकीकडे अण्णांनी विरोध दर्शवला आहे तर अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी मात्र या मसुद्याला पाठिंबा दिला आहे. सीबीआयवर लोकपलाचं नियंत्रण असावं ही मागणी यात फेटाळण्यात आली असली तरी सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रीया समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकीकडे अण्णांनी या नवीन मसुद्याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी किरण बेदींनी समर्थन केल्यानं अण्णांच्या गटात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2013 09:57 AM IST

'लोकपाल'ला अण्णांचा विरोध,बेदींचा पाठिंबा

01 फेब्रुवारी

अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या सुधारीत मसुद्याला विरोध केला आहे. सरकारनं सर्व देशाची फसवणूक केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. टीम अण्णांनी, देशातल्या इतर संस्थांनी केलेल्या कुठल्याही सुचनांचा या मसुद्यात समावेश करण्यात आलेला नाही. सरकारनं स्वत:चा मसुदा स्वत: तयार केला आहे. या जनलोकपालच्या विरोधात पुढचे दीड वर्ष देशभर जनजागृती करणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. तसंच गरज पडली तर पुन्हा एकदा रामलीलावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे. मात्र एकीकडे अण्णांनी विरोध दर्शवला आहे तर अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी मात्र या मसुद्याला पाठिंबा दिला आहे. सीबीआयवर लोकपलाचं नियंत्रण असावं ही मागणी यात फेटाळण्यात आली असली तरी सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रीया समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकीकडे अण्णांनी या नवीन मसुद्याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी किरण बेदींनी समर्थन केल्यानं अण्णांच्या गटात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2013 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close