S M L

ईद साधेपणानं साजरी करा - मुस्लीम संघटनांचं आवाहन

5 डिसेंबर, दिल्लीएहतेशाम खानमुंबई हल्ल्याचा निषेध म्हणून यावेळी बकरी ईद साधेपणानं साजरी करण्याच आवाहन मुस्लीम संघटनांनी केलंय. ईदच्या दिवशी,मुंबई हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची आठवण ठेवा आणि अत्यंत साधेपाणानं ईद साजरी करा असं त्यांनी सांगितलंय.ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यात येईल पण मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून नवीन कपडे घालण्यात येणार नाहीत. कपड्यावर काळे बिल्ले लावण्यात येतील.देशावर दहशतवाद्यांचे हल्ले वाढतायत. यात हिंदू आणि मुसलमान दोघांचेही बळी जातायत. त्यामुळेच दहशतवादाशी लढण्यासाठी सगळ्या मुस्लीम संघटनांनी मिळून, एक मुस्लीम कोऑर्डीनेशन कमिटी स्थापन केली आहे.या कमिटीनंही बकरी ईद साधेपणानं साजरी करण्याच आवाहन केलंय.सध्या हजचा महिना सुरू आहे. भारतातून एक लाखाच्यावर मुसलमान हज यात्रेसाठी गेले आहेत. जेव्हा हे लोकं खुदापुढं नतमस्तक होतील तेव्हा भारतासाठी सुख - शांती आणि जगासमोर इस्लामाची चुकीची प्रतिमा निर्माण करणार्‍या दहशतवाद्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना नक्कीच करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 07:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 07:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close