S M L

संपामुळे गैरहजर अधिकार्‍याचा कान कापला

21 फेब्रुवारीकामगार संघटनांनी पुकारलेला दोन दिवसांचा संप एका अधिकार्‍याच्या जीवावर बेतला आहे. कोलकातामध्ये देशव्यापी संपामुळे पंचायत समितीत अधिकारी कामाला आला नाही, म्हणून तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकार्‍याचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल मुरशीदाबाद जिल्ह्यातल्या देबीपूर या गावात पंचायत समितीमध्ये कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता.पण आज एक अधिकारी कामवर हजर झाला. यावेळी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी या अधिकार्‍याला धक्काबुक्की केली आणि त्याचा कान कापला. कार्यालयाच्या शेजारील लोकांनी या अधिकार्‍याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. संप असल्यामुळे आपण कामावर हजर राहू शकलो नाही म्हणून माझ्यावर हल्ला का केला ? असा संतप्त सवाल या अधिकार्‍यांनी विचारला आहे. मात्र याबद्दल अजून पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2013 09:52 AM IST

संपामुळे गैरहजर अधिकार्‍याचा कान कापला

21 फेब्रुवारी

कामगार संघटनांनी पुकारलेला दोन दिवसांचा संप एका अधिकार्‍याच्या जीवावर बेतला आहे. कोलकातामध्ये देशव्यापी संपामुळे पंचायत समितीत अधिकारी कामाला आला नाही, म्हणून तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकार्‍याचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल मुरशीदाबाद जिल्ह्यातल्या देबीपूर या गावात पंचायत समितीमध्ये कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता.पण आज एक अधिकारी कामवर हजर झाला. यावेळी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी या अधिकार्‍याला धक्काबुक्की केली आणि त्याचा कान कापला. कार्यालयाच्या शेजारील लोकांनी या अधिकार्‍याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. संप असल्यामुळे आपण कामावर हजर राहू शकलो नाही म्हणून माझ्यावर हल्ला का केला ? असा संतप्त सवाल या अधिकार्‍यांनी विचारला आहे. मात्र याबद्दल अजून पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2013 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close