S M L

नरेंद्र मोदींचं ब्रँड गुजरातचं प्रमोशन

06 फेब्रुवारीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज गुजरातबाहेर पाय रोवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. नवी दिल्लीतलं ख्यातनाम बिझनेस कॉलेज असलेल्या श्रीराम कॉलेजमध्ये व्याख्यान देण्याचं निमंत्रण मोदींना मिळालं आणि त्यांनी ते तात्काळ स्वीकारलं. गुजरातबाहेरच्या मतदारांशी संवाद साधण्याची मोदींची ही पहिलीच वेळ होती. आपल्या तासभराच्या भाषणात मोदींनी तरुणांना एकच स्वप्न दाखवलं. विकास म्हणजे गुजरात...गुजरातच्या विकासाची आज देशभर चर्चा होतेय, आम्ही सुराज्यावर भर दिला. सध्याची परिस्थिती पाहिली तर देश निराशेच्या गर्तेत आहे. देशात भ्रष्टाचार फोफावलाय अशी टीका त्यांनी सरकारवर केली. जगभरात भारत सर्वात तरुण देश आहे. 60 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची असतानाही आपण युवाशक्तीचा योग्य वापर करु शकलो नाही. आपण संधी गमावत चाललो आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधींचाही ओझरता उल्लेख करत टीका केली. दरम्यान, मोदींचं व्याख्यान सुरू असताना श्रीराम कॉलेजबाहेर डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोदी हे जातीयवादी असल्याच्या घोषणा त्यांनी दिल्या. पंतप्रधानांची घेतली भेटश्रीराम कॉलेजमध्ये झालेल्या या व्याख्यानापूर्वी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुजरातमधल्या रखडलेल्या प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. गुजरातमधल्या गॅसच्या दराच्या मुद्यावर कोर्टाच्या निर्णयाचं पालन केंद्रानं करावं अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली. तर विकासासाठी गुजरात सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती मोदींनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2013 12:21 PM IST

नरेंद्र मोदींचं ब्रँड गुजरातचं प्रमोशन

06 फेब्रुवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज गुजरातबाहेर पाय रोवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. नवी दिल्लीतलं ख्यातनाम बिझनेस कॉलेज असलेल्या श्रीराम कॉलेजमध्ये व्याख्यान देण्याचं निमंत्रण मोदींना मिळालं आणि त्यांनी ते तात्काळ स्वीकारलं. गुजरातबाहेरच्या मतदारांशी संवाद साधण्याची मोदींची ही पहिलीच वेळ होती. आपल्या तासभराच्या भाषणात मोदींनी तरुणांना एकच स्वप्न दाखवलं. विकास म्हणजे गुजरात...

गुजरातच्या विकासाची आज देशभर चर्चा होतेय, आम्ही सुराज्यावर भर दिला. सध्याची परिस्थिती पाहिली तर देश निराशेच्या गर्तेत आहे. देशात भ्रष्टाचार फोफावलाय अशी टीका त्यांनी सरकारवर केली. जगभरात भारत सर्वात तरुण देश आहे. 60 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची असतानाही आपण युवाशक्तीचा योग्य वापर करु शकलो नाही. आपण संधी गमावत चाललो आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधींचाही ओझरता उल्लेख करत टीका केली. दरम्यान, मोदींचं व्याख्यान सुरू असताना श्रीराम कॉलेजबाहेर डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोदी हे जातीयवादी असल्याच्या घोषणा त्यांनी दिल्या.

पंतप्रधानांची घेतली भेट

श्रीराम कॉलेजमध्ये झालेल्या या व्याख्यानापूर्वी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुजरातमधल्या रखडलेल्या प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. गुजरातमधल्या गॅसच्या दराच्या मुद्यावर कोर्टाच्या निर्णयाचं पालन केंद्रानं करावं अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली. तर विकासासाठी गुजरात सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती मोदींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2013 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close