S M L

'महिला आयोगा'बाबत मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी सुरूच

30 जानेवारीराज्यातील महिला आयोगावर अध्यक्ष नेमण्याचं आश्वासन अजूनही हवेतच आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टोलवाटोलवी सुरूच आहे. अनेक वेळा आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होतेय. पण प्रत्येकवेळी चर्चा सुरू आहे लवकरच नियुक्ती करु असं आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. दिल्लीतल्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात संतापाची लाट उसळली. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला चार वर्षांपासून अध्यक्ष नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. हाच सवाल आयबीएन-लोकमतनं मुख्यमंत्र्यांना विचारला, तेव्हा आठवडाभरा़त महिला अध्यक्षाची निवड केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण अजूनही परिस्थितीत बदल झालेला नाहीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 12:13 PM IST

'महिला आयोगा'बाबत मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी सुरूच

30 जानेवारी

राज्यातील महिला आयोगावर अध्यक्ष नेमण्याचं आश्वासन अजूनही हवेतच आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टोलवाटोलवी सुरूच आहे. अनेक वेळा आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होतेय. पण प्रत्येकवेळी चर्चा सुरू आहे लवकरच नियुक्ती करु असं आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. दिल्लीतल्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात संतापाची लाट उसळली. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला चार वर्षांपासून अध्यक्ष नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. हाच सवाल आयबीएन-लोकमतनं मुख्यमंत्र्यांना विचारला, तेव्हा आठवडाभरा़त महिला अध्यक्षाची निवड केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण अजूनही परिस्थितीत बदल झालेला नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close