S M L

नारायण राणेंचं बंड

5 डिसेंबर, मुंबई मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध आज बंड पुकारलं. पक्षश्रेष्ठी, विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार अशोक चव्हाण यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केली. ' मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून मी माघार घेत आहे. मला काँग्रेसचं कोणतंही पद नको. मुख्यमंत्रीपदाची चर्चा होत असताना माझं नाव घोषित करायला पाहिजे होतं. मी याआधी मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले अशोक चव्हाण माझे स्पर्धक नाही. मुख्यमंत्री निवडीसाठी पक्ष निरीक्षक पाठवणं, हे काँग्रेसचं सगळं नाटक आहे ', असं राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदाच्या नावावरील कलंक आहे,अशी सणसणीत टीका राणे यांनी यावेळी केली. पुढे ते म्हणाले, पक्ष शब्दाला जागला नाही. मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय होईल, तो आता शिवसेनेला पोषक ठरणार आहे. दरम्यान, बंड करणार्‍या राणेंवर कारवाईचे संकेत पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिले आहेत. दरम्यान नियोजित मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रात्री राज्यपाल एस.सी. जमीर यांची भेट घेतली. आणि 168 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केलं. तसंच दोषी आढळल्यास नारायण राणे यांच्या बाबत हायकमांडच निर्णय घेतील असं मनु संघवी यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close