S M L

हासनला धक्का, 'विश्वरूपम'वर बंदी कायम

30 जानेवारीअभिनेता कमल हासनला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मद्रास हायकोर्टाने 'विश्वरुपम'च्या प्रदर्शनाला स्थगिती दिलीय. हा सिनेमा आता येत्या 6 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकणार नाही. काल मद्रास हायकोर्टानं 'विश्वरुपम'च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर काही वादग्रस्त सीन्स वगळून सिनेमा प्रदर्शना करायला कमल हसन राजी झाले होते. मात्र आज कोर्टाने प्रदर्शनाला स्टे दिला आहे. आता हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात कमल हासन सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. कोर्टाच्या सुनावणीअगोदर कमल हासन यांनी पत्रकार परिषद घेऊन मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडेन असा इशारा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 12:29 PM IST

हासनला धक्का, 'विश्वरूपम'वर बंदी कायम

30 जानेवारी

अभिनेता कमल हासनला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मद्रास हायकोर्टाने 'विश्वरुपम'च्या प्रदर्शनाला स्थगिती दिलीय. हा सिनेमा आता येत्या 6 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकणार नाही. काल मद्रास हायकोर्टानं 'विश्वरुपम'च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर काही वादग्रस्त सीन्स वगळून सिनेमा प्रदर्शना करायला कमल हसन राजी झाले होते. मात्र आज कोर्टाने प्रदर्शनाला स्टे दिला आहे. आता हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात कमल हासन सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. कोर्टाच्या सुनावणीअगोदर कमल हासन यांनी पत्रकार परिषद घेऊन मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडेन असा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close