S M L

सुशीलकुमार शिंदेंना गृहमंत्रीपदावरून हटवा -राजनाथ सिंग

24 जानेवारीकेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी भाजपनं आज देशभरात आंदोलन सुरू केलंय. तसंच सुशीलकुमार शिंदे यांना पंतप्रधानांनी हटवलं नाही तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिला. आज जंतरमंतरवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलंय. संघ आणि भाजप अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. सरकारनं माफी मागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिलाय.मात्र काँग्रेसने भाजपची मागणी फेटाळून लावली आहे आणि सुशीलकुमार शिंदेंची पाठराखण केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 10:04 AM IST

सुशीलकुमार शिंदेंना गृहमंत्रीपदावरून हटवा -राजनाथ सिंग

24 जानेवारी

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी भाजपनं आज देशभरात आंदोलन सुरू केलंय. तसंच सुशीलकुमार शिंदे यांना पंतप्रधानांनी हटवलं नाही तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिला. आज जंतरमंतरवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलंय. संघ आणि भाजप अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. सरकारनं माफी मागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिलाय.मात्र काँग्रेसने भाजपची मागणी फेटाळून लावली आहे आणि सुशीलकुमार शिंदेंची पाठराखण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close