S M L

आशिष नंदी यांनी मागितली माफी

26 जानेवारीओबीसी आणि दलितांमुळे भ्रष्टाचार वाढल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे लेखक आशिष नंदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो अशा शब्दात नंदी यांनी माफी मागितली. मला श्रीमंतांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं होतं असा खुलासाही त्यांनी केला. मात्र नंदी यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतं आहे. बसपा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नंदी यांचे वक्तव्य अत्यंत निदनीय आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. नंदी यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाची जाहीर मागावी अशी मागणी मायावती यांनी केली. तर नंदी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का हे तपासून पाहावे लागणार आहे. देशात भ्रष्टाचार प्रकरणात दलित समाजाच्या व्यक्तीचा उल्लेख नाही. नंदी यांचं वक्तव्य अत्यंत मुर्खपणाचे आहे. नंदी यांच्यावर जयपूर पोलिसांनी ऍट्रासिटीचा गुन्हा नोंदवला पाहिजे. अशा नंदीवर बंदी आणावी. देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे पण चुकीचे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी निषेध केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2013 12:51 PM IST

आशिष नंदी यांनी मागितली माफी

26 जानेवारी

ओबीसी आणि दलितांमुळे भ्रष्टाचार वाढल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे लेखक आशिष नंदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो अशा शब्दात नंदी यांनी माफी मागितली. मला श्रीमंतांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं होतं असा खुलासाही त्यांनी केला. मात्र नंदी यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतं आहे. बसपा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नंदी यांचे वक्तव्य अत्यंत निदनीय आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. नंदी यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाची जाहीर मागावी अशी मागणी मायावती यांनी केली. तर नंदी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का हे तपासून पाहावे लागणार आहे. देशात भ्रष्टाचार प्रकरणात दलित समाजाच्या व्यक्तीचा उल्लेख नाही. नंदी यांचं वक्तव्य अत्यंत मुर्खपणाचे आहे. नंदी यांच्यावर जयपूर पोलिसांनी ऍट्रासिटीचा गुन्हा नोंदवला पाहिजे. अशा नंदीवर बंदी आणावी. देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे पण चुकीचे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी निषेध केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2013 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close