S M L

मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण

5 डिसेंबर, मुंबई महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे. पक्ष निरीक्षक प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. ' मी आणि ए. के.अ‍ॅन्टोनी यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांची भेट घेतली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आणि सर्वांची मतं लक्षात घेऊन आम्ही ही निवड केली आहे ', असं प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. या घोषणेनंतर गेले तीन दिवस सुरु असलेला मुख्यमंत्रीपदाचा घोळ अखेर संपुष्टात आला. मुख्यमंत्री पदी अशोक चव्हाण यांचं नाव निश्चित असल्याची बातमी सर्वप्रथम आयबीएन लोकमतनं दिली होती. आज या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. नव्या मुख्यमंत्र्याची निवडीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. विलासराव देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी विधानभवनात दुपारी उशीरा काँग्रेस आमदारांची बैठक सुरू झाली. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची त्यांनी स्वतंत्रपणे मुलाखत घेतली. काँग्रेच्या पदाधिकार्‍यांशीही त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुरवातीला सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील आणि नारायण राणे यांची नावं चर्चेत होती. नंतर मात्र चव्हाण आणि राणे यांच्यात चुरस राहिली. पण त्यात अखेर अशोक चव्हाण चव्हाण यांनी बाजी मारली. "आज महाराष्ट्रातली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे ही सेलिब्रेशनची वेळ नाही" अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close