S M L

पाक महिला क्रिकेट टीमचे सामने मुंबईबाहेर

18 जानेवारीपाकिस्तानच्या कुरापतखोरीमुळे याचे परिणाम खेळावरही दिसून आले. याचा पहिला फटका बसला तो पाकच्या हॉकीपटूंना. शिवसेनेनं कडाडून केलेल्या विरोधामुळे हॉकीपटूना मायदेशी परतावे लागले. पण हेच संकट महिला क्रिकेट वर्ल्डकपवर पण घोंघावत होते. पण आता हे संकट टळले असून पाकिस्तान टीमचे सामने महाराष्ट्र वगळून इतरत हलवण्यात आले आहे. आता मुंबईबरोबर कटक या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंना शिवसेनेनं केलेल्या विरोधामुळे पाकिस्तानच्या मॅच मुंबईबाहेर हलवण्याची विनंती बीसीसीआयनं आयसीसीकडे केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आणि ग्रुप बीच्या सर्व मॅच आता कटकमध्ये होणार आहेत. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा ग्रुप बीमध्ये समावेश आहे. जर पाकिस्तान नॉक आऊट स्टेजसाठी पात्र ठरली तर पाकिस्तानच्या ही मॅचदेखील कटकमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्नसुद्धा सध्या सुटला. 31 जानेवारीपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा भारतात रंगतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2013 02:45 PM IST

पाक महिला क्रिकेट टीमचे सामने मुंबईबाहेर

18 जानेवारी

पाकिस्तानच्या कुरापतखोरीमुळे याचे परिणाम खेळावरही दिसून आले. याचा पहिला फटका बसला तो पाकच्या हॉकीपटूंना. शिवसेनेनं कडाडून केलेल्या विरोधामुळे हॉकीपटूना मायदेशी परतावे लागले. पण हेच संकट महिला क्रिकेट वर्ल्डकपवर पण घोंघावत होते. पण आता हे संकट टळले असून पाकिस्तान टीमचे सामने महाराष्ट्र वगळून इतरत हलवण्यात आले आहे. आता मुंबईबरोबर कटक या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंना शिवसेनेनं केलेल्या विरोधामुळे पाकिस्तानच्या मॅच मुंबईबाहेर हलवण्याची विनंती बीसीसीआयनं आयसीसीकडे केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आणि ग्रुप बीच्या सर्व मॅच आता कटकमध्ये होणार आहेत. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा ग्रुप बीमध्ये समावेश आहे. जर पाकिस्तान नॉक आऊट स्टेजसाठी पात्र ठरली तर पाकिस्तानच्या ही मॅचदेखील कटकमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्नसुद्धा सध्या सुटला. 31 जानेवारीपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा भारतात रंगतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2013 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close