S M L

ही सेलिब्रेशनची वेळ नाही- अशोक चव्हाण

5 डिसेंबर मुंबईमहाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी महाराष्ट्रात कोणत्याही प्रकाराचं सेलिब्रेशन करू नये. महाराष्ट्रात आज वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन, समारंभांच आयोजन करू नये. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले, नारायण राणे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. आणि सद्यातरी कोणाच्याही व्यक्तीगत टीकेवर मी आत्ताच कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असं ते म्हणाले.आत्ता महाराष्ट्राची प्राथमिकता वेगळी आहे. मुंबईतील हल्ल्यामुळे जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आज सर्वसामान्य माणसाला कोण मुख्यमंत्री होईल. कोण कोणता मंत्री होईल याबाबत स्वारस्य नाही. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यावर ही जबाबदारी आहे की त्याने पहिलं काम म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे. तसंच व्यक्तीगत टीका सोडून कामाला प्राथमिकता दिली पाहिजे.शेवटी त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रणव मुखर्जी, ए.के. अ‍ॅथनी, विलासराव देशमुख, माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 12:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close