S M L

राहुल गांधींच्या समोरच काँग्रेस नेत्यांचा 'गोंधळ'

01 मार्चकाँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यावर राहुल गांधी आज पहिल्यांदा मुंबईत आले. आणि या पहिल्याच दौर्‍यात मुंबई काँग्रेसमधली बंडाळी समोर आली. राहुल गांधींनी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली त्यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष वसंत ननावरे यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर आरोप केले. ज्या माणसानं जयप्रकाश नारायण यांच्या साथीनं इंदिरा गांधींच्या विरोधात काम केलं त्या माणसाला प्रदेश काँग्रेसचं प्रभारी बनवलं गेलंय. त्यामुळे तो काँग्रेसचं हित जपण्याऐवजी काँग्रेसचे नुकसान करतोय जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतोय असे आरोप त्यांनी केले. यावेळी राहुल गांधींच्या सभेत चांगलाच गोंधळ उडाल्याचं समजतंय. पण असं काही घडलंच नसल्याचा आव काँग्रेसचे प्रवक्ते आणत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2013 04:27 PM IST

राहुल गांधींच्या समोरच काँग्रेस नेत्यांचा 'गोंधळ'

01 मार्च

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यावर राहुल गांधी आज पहिल्यांदा मुंबईत आले. आणि या पहिल्याच दौर्‍यात मुंबई काँग्रेसमधली बंडाळी समोर आली. राहुल गांधींनी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली त्यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष वसंत ननावरे यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर आरोप केले. ज्या माणसानं जयप्रकाश नारायण यांच्या साथीनं इंदिरा गांधींच्या विरोधात काम केलं त्या माणसाला प्रदेश काँग्रेसचं प्रभारी बनवलं गेलंय. त्यामुळे तो काँग्रेसचं हित जपण्याऐवजी काँग्रेसचे नुकसान करतोय जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतोय असे आरोप त्यांनी केले. यावेळी राहुल गांधींच्या सभेत चांगलाच गोंधळ उडाल्याचं समजतंय. पण असं काही घडलंच नसल्याचा आव काँग्रेसचे प्रवक्ते आणत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2013 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close