S M L

नंदींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल

26 जानेवारीओबीसी आणि दलितांमुळे भ्रष्टाचार वाढल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे लेखक आशिष नंदी यांच्याविरोधात आता आयपीसी (IPC)च्या कलम 506 आणि एससी-एसटी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं नंदी यांना याप्रकरणात शिक्षा झाली तर त्यांना 10 वर्षांसाठी तुरुंगात जावं लागेल. आज जयपूरमध्ये साहित्य उत्सवात देशात ओबीसी आणि दलितांमुळेच भ्रष्टाचार वाढल्याचं खळबळजनक व्यक्तव्य प्रसिद्ध लेखक आशीष नंदी यांनी केले. नंदी यांच्या या वक्तव्यावर देशभरातून आक्षेप घेण्यात येतोय. नंदी यांची टीका आक्षेपार्ह असून त्यांना संमेलनाच्या बाहेर काढावं अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. राज्यातील अनेक मागसवर्गीय संघटनांनी नंदी यांच्या विधानावर तीव्र नाराज व्यक्त केला आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती, रिपाईंचे नेते रामदास आठवले, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नंदींच्या विधानाचा निषेध केला. अखेर संध्याकाळी नंदी यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो अशा शब्दात नंदी यांनी माफी मागितली. मला श्रीमंतांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं होतं असा खुलासाही त्यांनी केला. नंदींनी जाहीर माफी मागावी - मायावतीमात्र नंदी यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतं आहे. बसपा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नंदी यांचे वक्तव्य अत्यंत निदनीय आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. नंदी यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाची जाहीर मागावी अशी मागणी मायावती यांनी केली. नंदींविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवावा- आठवलेतर नंदी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का हे तपासून पाहावे लागणार आहे. देशात भ्रष्टाचार प्रकरणात दलित समाजाच्या व्यक्तीचा उल्लेख नाही. नंदी यांचं वक्तव्य अत्यंत मुर्खपणाचे आहे. नंदी यांच्यावर जयपूर पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला पाहिजे. अशा नंदीवर बंदी आणावी. देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे पण चुकीचे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी निषेध केलाय.कोण आहेत आशिष नंदी ?- राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले प्रसिद्ध विचारवंत- नागपूरच्या हिसलोप कॉलेजमध्ये शिक्षण- शिक्षणाने क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ- राजकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून भारतात प्रसिद्ध- समकालीन सांस्कृतिक समीक्षक- भारतातल्या जाती व्यवस्थेचे अभ्यासक- CSDSचे माजी संचालक- लेखनासाठीच्या मानाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी- 'टॉकिंग इंडिया'सह अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2013 02:04 PM IST

नंदींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल

26 जानेवारी

ओबीसी आणि दलितांमुळे भ्रष्टाचार वाढल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे लेखक आशिष नंदी यांच्याविरोधात आता आयपीसी (IPC)च्या कलम 506 आणि एससी-एसटी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं नंदी यांना याप्रकरणात शिक्षा झाली तर त्यांना 10 वर्षांसाठी तुरुंगात जावं लागेल.

आज जयपूरमध्ये साहित्य उत्सवात देशात ओबीसी आणि दलितांमुळेच भ्रष्टाचार वाढल्याचं खळबळजनक व्यक्तव्य प्रसिद्ध लेखक आशीष नंदी यांनी केले. नंदी यांच्या या वक्तव्यावर देशभरातून आक्षेप घेण्यात येतोय. नंदी यांची टीका आक्षेपार्ह असून त्यांना संमेलनाच्या बाहेर काढावं अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. राज्यातील अनेक मागसवर्गीय संघटनांनी नंदी यांच्या विधानावर तीव्र नाराज व्यक्त केला आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती, रिपाईंचे नेते रामदास आठवले, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नंदींच्या विधानाचा निषेध केला. अखेर संध्याकाळी नंदी यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो अशा शब्दात नंदी यांनी माफी मागितली. मला श्रीमंतांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं होतं असा खुलासाही त्यांनी केला.

नंदींनी जाहीर माफी मागावी - मायावती

मात्र नंदी यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतं आहे. बसपा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नंदी यांचे वक्तव्य अत्यंत निदनीय आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. नंदी यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाची जाहीर मागावी अशी मागणी मायावती यांनी केली. नंदींविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवावा- आठवले

तर नंदी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का हे तपासून पाहावे लागणार आहे. देशात भ्रष्टाचार प्रकरणात दलित समाजाच्या व्यक्तीचा उल्लेख नाही. नंदी यांचं वक्तव्य अत्यंत मुर्खपणाचे आहे. नंदी यांच्यावर जयपूर पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला पाहिजे. अशा नंदीवर बंदी आणावी. देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे पण चुकीचे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी निषेध केलाय.

कोण आहेत आशिष नंदी ?

- राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले प्रसिद्ध विचारवंत- नागपूरच्या हिसलोप कॉलेजमध्ये शिक्षण- शिक्षणाने क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ- राजकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून भारतात प्रसिद्ध- समकालीन सांस्कृतिक समीक्षक- भारतातल्या जाती व्यवस्थेचे अभ्यासक- CSDSचे माजी संचालक- लेखनासाठीच्या मानाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी- 'टॉकिंग इंडिया'सह अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2013 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close