S M L

सुनील तटकरे आणखी गोत्यात

08 फेब्रुवारीबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा अशी सूचना कोर्टाने केली आहे. सिंचन घोटाळ्यातल्या सहभागाचा आरोप, रायगमधली बेकायदेशीर जमीन खरेदी, आणि बोगस कंपन्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तटकरेंच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात एकत्रित सुनावणी झाली. आणि कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2013 02:15 PM IST

सुनील तटकरे आणखी गोत्यात

08 फेब्रुवारी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा अशी सूचना कोर्टाने केली आहे. सिंचन घोटाळ्यातल्या सहभागाचा आरोप, रायगमधली बेकायदेशीर जमीन खरेदी, आणि बोगस कंपन्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तटकरेंच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात एकत्रित सुनावणी झाली. आणि कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2013 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close