S M L

एसीपी वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली

12 जानेवारीमुंबई पोलीस दलातील वादग्रस्त एसीपी वसंत ढोबळे यांची शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईमध्येच मुख्य पोलीस कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांनी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची घोषणा केली.शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील वाकोला भागातील अनधिकृत फेरीवाले मदन जैसवाल यांचा बेकायदेशीर असलेली दुकाने हटवताना त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हा मृत्यू ढोबळे यांच्या त्रासामुळे झाल्याचं इतर स्थानीक फेरिवाल्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्तं झालं होतं. फेरीवाला मदन जैसवाल यांना जवळच्या व्हि एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. जैस्वाल यांच्या मृत्यूनंतर स्थानिक फेरिवाल्यांनी गोंधळ घातला आणि या गोंधळात भर घालण्यात तिथे काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त, काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह तिथे दाखल झाले आणि त्यांनी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची मागणी करत परिस्थिती आणखी तणावग्रस्त बनवली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी रात्री मुंबईचे सहआयुक्त सदानंद दाते यांना यावं लागलं. गोंधळ घालणार्‍या लोकांना आणि नेत्यांना शांत करण्यासाठी त्यांनी, तडकाफडकी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची घोषणा करावी लागली. ढोबळेंच्या बदलीच्या घोषणेनंतर संतप्त जमाव शांत झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2013 10:30 AM IST

एसीपी वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली

12 जानेवारी

मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त एसीपी वसंत ढोबळे यांची शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईमध्येच मुख्य पोलीस कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांनी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची घोषणा केली.

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील वाकोला भागातील अनधिकृत फेरीवाले मदन जैसवाल यांचा बेकायदेशीर असलेली दुकाने हटवताना त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हा मृत्यू ढोबळे यांच्या त्रासामुळे झाल्याचं इतर स्थानीक फेरिवाल्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्तं झालं होतं. फेरीवाला मदन जैसवाल यांना जवळच्या व्हि एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

जैस्वाल यांच्या मृत्यूनंतर स्थानिक फेरिवाल्यांनी गोंधळ घातला आणि या गोंधळात भर घालण्यात तिथे काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त, काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह तिथे दाखल झाले आणि त्यांनी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची मागणी करत परिस्थिती आणखी तणावग्रस्त बनवली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी रात्री मुंबईचे सहआयुक्त सदानंद दाते यांना यावं लागलं. गोंधळ घालणार्‍या लोकांना आणि नेत्यांना शांत करण्यासाठी त्यांनी, तडकाफडकी एसीपी वसंत ढोबळेंच्या बदलीची घोषणा करावी लागली. ढोबळेंच्या बदलीच्या घोषणेनंतर संतप्त जमाव शांत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2013 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close