S M L

विमानतळावरील सुरक्षेत वाढ

5 डिसेंबर नवी दिल्लीमितू जैनअमेरिकेत झालेल्या 9/11 च्या विमान हल्ल्यासारखाच हल्ला भारतातही होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत यासंबंधात चर्चा करण्यात आली. त्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं विमानतळावरच्या सुरक्षेत वाढ केली आहे. नुकताच मुंबईत समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला झाला. आता अमेरिकेप्रमाणे 9/11 सारखा विमानहल्ल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या इशा-याची दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशातल्या सर्व 80 विमानतळांना हाय अ‍ॅलर्टचा इशारा दिला आहे. नुकतीच लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी संरक्षणमंत्री ए. के. अँथोनी यांची भेट घेतली. आणि त्यांनी संभावित हल्ल्याची भीती व्यक्त केली. छोट्या एअरपोर्टना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. कुठलंही विमान त्याच्या रडार सिस्टिमवरून गायब झाल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचा इशारा संबंधित यंत्रणांना देण्यात आला आहे. सर्व संवेदनशील विमानांमध्ये एअर मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे. एनएसजीचं अपहरण विरोधी पथक दिल्ली एअरपोर्टवर तैनात आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या एअरपोर्टना ज्यादा सुरक्षा देण्यात येणार आहे. सुरक्षा कडक झाल्यानं आता एअरपोर्टवर चेक इनसाठी प्रवाश्यांना रांगेत अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 11:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close