S M L

मुंबईवरील हल्ल्यामुळे सुरक्षेबाबत जागरुकता वाढतेय

4 डिसेंबर, मुंबई नेहा आनंदमुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. केवळ कंपन्याच नाही तर हाऊसिंग सोसायट्या,अपार्टमेंट आणि सरकारी ऑफिसेसमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय आणि या सर्व गोष्टींमुळे जास्त फायदा होतोय तो सिक्युरिटी एजन्सीजचा.दहशतवाद्यांनी सलग 60 तास मुंबईला वेठीस धरलं होतं. यानंतर हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरेशी नाही. ही गोष्ट सर्वात ठळकपणे जाणवली. मात्र आता सर्वांनीच सुरक्षा व्यवस्था मजबूत असली पाहिजे, असा आग्रह धरलाय. त्यामुळेच झायकॉम सिक्युरिटीज सारख्या कंपन्याचा बिझनेस वाढलाय. झायकॉमला गेल्या पाचच दिवसात सुमारे सत्तर कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्यात. झायकॉम सारख्या सुरक्षा यंत्रणा पुरवणार्‍या कंपन्यांना आता रिटेल दुकानं आणि इतर कंपन्याकडून ऑर्डर्स मिळतायत. काहीजण आधीच्याच सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करुन घेत आहेत.'आमच्या एका ग्राहकांकडून अचानक बुलेट प्रुफ जॅकेटची मागणी झाली. ही मागणी कधी झाली नव्हती. सुरक्षेच्या विविध उपकरणांची मागणी वाढू लागलीय ', असं श्रीजी सोल्यूशनचे मॅनेजर जयेश लोहाना यांनी सांगितलं.या वर्षात देशातल्या अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. पण मुंबईतल्या हल्ल्यानंतरच लोक सुरक्षा व्यवस्थेबाबत सजग झालेत असं सुरक्षा यंत्रणा पुरवणार्‍या कंपन्यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 03:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close