S M L

अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर...

5 डिसेंबर, मुंबई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची काँग्रेस हायकमांडनं निवड केली आहे. शरद पवारांचे कट्टर विरोधक असलेले शंकरराव चव्हाण यांचे ते चिरंजीव. सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण यांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात पुढे होतं. मुख्यमंत्री पदी निवड झालेल्या अशोक चव्हाण यांच्यापुढे अनेक आव्हानंआहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, ही त्यांच्यावर प्राथमिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होणारे अशोक चव्हाण हे मूळचे पैठणमधल्या कापेश्वर गावचे. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती नांदेडमधून. 25 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. मुंबईलाच पदवी आणि एमबीएचं शिक्षण घेऊन चव्हाण नांदेडच्या राजकारणात सक्रीय झाले. काही दिवस युवक काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर 1987ची निवडणुकीत ते नांदेडचे खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आले. 1993 ला त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास तसंच गृहराज्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर 1999 ला मुदखेड मतदार संघातूंन निवडून येत विलासरावांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून अशोकरावांनी कारभार सांभाळला आणि 2004च्या निवडणुकीत पुन्हा बाजी मारत विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेटमंत्री झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 03:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close