S M L

'...तर वेगळा विचार करावा लागेल'

12 जानेवारीभारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी लष्कर करत असलेलं युध्दबंदीचं उल्लंघन भारतीय हवाई दलानं गांभिर्यानं घेतलंय. पाकिस्तानने अशीच घुसखोरी कायम ठेवली तर हवाई दल वेगळा विचार करू शकतो असा इशारा हवाई दल प्रमुख एन एके ब्राऊन यांनी दिला. दोन्ही देशात 2003 साली झालेल्या युद्धविराम करारानुसार उल्लंघन करता येत नाही. पण पाककडून होत असलेलं उल्लंघन आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. जर पाक कडून हा उत्पात सुरूच राहिला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही बाऊन यांनी दिला. कोणता 'विचार' करावा लागेल असा प्रश्न विचारला असता ब्राऊन म्हणाले, विचार हा विचार असतो. असंच उल्लंघन सुरू राहील तर आम्हाला नव्याने या प्रकरणाची समीक्षा करावी लागेल. विशेष म्हणजे शुक्रवारी पाकिस्तान सरकारने सीमारेषेवर गोळीबारात पाकचा एक सैनिक ठार झाला असा आरोप केला होता. या घटनेचा पाकने निषेध व्यक्त केलाय. पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना तातडीनं बोलावून घटनेचा निषेध व्यक्त केला. पाकच्या या निषेधानंतर आज हवाई दल प्रमुख एन एके ब्राऊन यांनी पाकला सज्जड दम दिलाय. दरम्यान, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अधिक संवेदनशिल बनत चालेली आहे. पाकिस्तानने त्यांच्या सर्व सैनिकांच्या सुट्‌ट्या रद्द केल्यात. तसंच पाकिस्तानी लष्करातील ब्रिगेडियर स्तरावरील अधिकार्‍यांची बैठकसुद्धा बोलावण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन हे पंतप्रधानांना सतत बदलत्या परिस्थितीची माहिती देत आहेत. सीमेवरील पाकिस्तानची वाढती हालचाल पाहून भारतानेही सीमेवरील सैन्यात वाढ केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2013 12:22 PM IST

'...तर वेगळा विचार करावा लागेल'

12 जानेवारी

भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी लष्कर करत असलेलं युध्दबंदीचं उल्लंघन भारतीय हवाई दलानं गांभिर्यानं घेतलंय. पाकिस्तानने अशीच घुसखोरी कायम ठेवली तर हवाई दल वेगळा विचार करू शकतो असा इशारा हवाई दल प्रमुख एन एके ब्राऊन यांनी दिला. दोन्ही देशात 2003 साली झालेल्या युद्धविराम करारानुसार उल्लंघन करता येत नाही. पण पाककडून होत असलेलं उल्लंघन आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. जर पाक कडून हा उत्पात सुरूच राहिला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही बाऊन यांनी दिला. कोणता 'विचार' करावा लागेल असा प्रश्न विचारला असता ब्राऊन म्हणाले, विचार हा विचार असतो. असंच उल्लंघन सुरू राहील तर आम्हाला नव्याने या प्रकरणाची समीक्षा करावी लागेल.

विशेष म्हणजे शुक्रवारी पाकिस्तान सरकारने सीमारेषेवर गोळीबारात पाकचा एक सैनिक ठार झाला असा आरोप केला होता. या घटनेचा पाकने निषेध व्यक्त केलाय. पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना तातडीनं बोलावून घटनेचा निषेध व्यक्त केला. पाकच्या या निषेधानंतर आज हवाई दल प्रमुख एन एके ब्राऊन यांनी पाकला सज्जड दम दिलाय.

दरम्यान, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अधिक संवेदनशिल बनत चालेली आहे. पाकिस्तानने त्यांच्या सर्व सैनिकांच्या सुट्‌ट्या रद्द केल्यात. तसंच पाकिस्तानी लष्करातील ब्रिगेडियर स्तरावरील अधिकार्‍यांची बैठकसुद्धा बोलावण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन हे पंतप्रधानांना सतत बदलत्या परिस्थितीची माहिती देत आहेत. सीमेवरील पाकिस्तानची वाढती हालचाल पाहून भारतानेही सीमेवरील सैन्यात वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2013 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close