S M L

'विश्वरूपम' सिनेमाचं प्रदर्शन स्थगित

24 जानेवारीअभिनेता कमल हसन यांच्या बहुचर्चित 'विश्वरूपम' या चित्रपटाचं प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आलंय. काही मुस्लिम संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय. मुस्लीम समाजाबद्दल या चित्रपटात गैरसमज पसरवल्याचा आरोप संघटनांनी केलाय. त्यामुळे सध्या तामिळनाडू सरकारने 'विश्वरूपम' हा चित्रपट दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला आहे. याबाबत चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक कमल हसन यांनी नाराजी व्यक्त केलीय. मी नेहमी मुस्लिम समाजाबद्दल आदर बाळगतो. तसंच हिंदू मुस्लिम ऐक्यावर काम करण्यार्‍या हार्मनी इंडिया ऑर्गनायझेशनमध्ये माझा नेहमी उत्स्फुर्त सहभाग असतो. त्यामुळे माझ्यावर होणार्‍या आरोपांमुळे मला खूप वेदना झाल्याचं कमल हसन याचं म्हणणं आहे.कमल हसनचं पत्रक या सर्व प्रकारामुळे मला खूप दु:ख झालंय. माझ्या मुस्लीम बांधवांच्या विरोधात मी सिनेमा कसा बनवणार ? अशा आरोपांमुळे फक्त भावनाच दुखावल्या नाहीत, तर माझ्या संवेदनांचाही अपमान झालाय. माझा चित्रपट बघितल्यानंतर कुठल्याही निष्पक्ष आणि देशाभिमानी मुस्लीमांना माझा चित्रपट बघून नक्कीच अभिमान वाटेल. यानंतर मी सगळा निर्णय कायद्यावर सोडतो. पण अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद थांबला पाहिजे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 11:29 AM IST

'विश्वरूपम' सिनेमाचं प्रदर्शन स्थगित

24 जानेवारी

अभिनेता कमल हसन यांच्या बहुचर्चित 'विश्वरूपम' या चित्रपटाचं प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आलंय. काही मुस्लिम संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय. मुस्लीम समाजाबद्दल या चित्रपटात गैरसमज पसरवल्याचा आरोप संघटनांनी केलाय. त्यामुळे सध्या तामिळनाडू सरकारने 'विश्वरूपम' हा चित्रपट दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला आहे. याबाबत चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक कमल हसन यांनी नाराजी व्यक्त केलीय. मी नेहमी मुस्लिम समाजाबद्दल आदर बाळगतो. तसंच हिंदू मुस्लिम ऐक्यावर काम करण्यार्‍या हार्मनी इंडिया ऑर्गनायझेशनमध्ये माझा नेहमी उत्स्फुर्त सहभाग असतो. त्यामुळे माझ्यावर होणार्‍या आरोपांमुळे मला खूप वेदना झाल्याचं कमल हसन याचं म्हणणं आहे.

कमल हसनचं पत्रक

या सर्व प्रकारामुळे मला खूप दु:ख झालंय. माझ्या मुस्लीम बांधवांच्या विरोधात मी सिनेमा कसा बनवणार ? अशा आरोपांमुळे फक्त भावनाच दुखावल्या नाहीत, तर माझ्या संवेदनांचाही अपमान झालाय. माझा चित्रपट बघितल्यानंतर कुठल्याही निष्पक्ष आणि देशाभिमानी मुस्लीमांना माझा चित्रपट बघून नक्कीच अभिमान वाटेल. यानंतर मी सगळा निर्णय कायद्यावर सोडतो. पण अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद थांबला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close