S M L

एक 'स्पेशल' सिनेमा (समीक्षा)

अमोल परचुरे, समीक्षक08 फेब्रुवारी'स्पेशल 26' हा दिग्दर्शक नीरज पांडेचा 'वेन्स्डे' नंतरचा दुसराच सिनेमा..मध्यंतरीच्या काळात त्याने 'तार्‍यांचं बेट' या मराठी सिनेमाची निर्मिती केली. पण दिग्दर्शक म्हणून त्याच्या दुसर्‍या सिनेमाबद्दल उत्सुकता होती आणि तो सिनेमा म्हणजे स्पेशल छब्बीस... दबंग आणि रेस 2 सारखे सपक सिनेमे जबरदस्त धंदा करत असताना स्पेशल छब्बीस सारखा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरतो. एक अतिशय जबरदस्त कल्पना आणि त्यावर तेवढ्याच मेहनतीनं साकारलेला सिनेमा 'स्पेशल 26'...1987 चा काळ दाखवण्याची मेहनत असो किंवा कलाकारांनी साकारलेला नैसर्गिक अभिनय, पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी जमून आल्या की काय धमाल येते याचा अनुभव देणारा सिनेमा म्हणजे स्पेशल छब्बीस...अर्थात, सगळ्याच गोष्टी जमलेल्या नाहीत हेसुध्दा तितकंच खरं, पण तरीही कॉन मूव्हीसाठी आवश्यक असलेला सगळा मसाला जमवण्यात नीरज पांडे बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय एवढं खरं...ही गोष्ट आहे चार तोतया सीबीआय अधिकारी आणि त्यांचा माग काढणार्‍या खर्‍याखुर्‍या सीबीआय अधिकार्‍याची...देशभरात या तोतया अधिकार्‍यांनी उच्छाद मांडलेला आहे. कारण राजकारणी, व्यापारी यांच्या मालमत्तेवर बनावट छापे टाकून चोरीचा नवा धंदाच या खोट्या सीबीआय अधिकार्‍यानी सुरु केलाय. ऐंशीच्या दशकात या अशा लोकांकडे भरमसाठ काळा पैसा खेळत होता आणि त्यांच्यावर सीबीआयच्या छाप्यांचं सत्रही सुरू झालं होतं. याचाच फायदा घेत हे चार तोतया घेतात आणि छापे टाकायला सुरुवात करतात. छापा पडून गेल्यावर जेव्हा तो बनावट होता हे लक्षात येतं तेव्हा नाचक्कीच्या भीतीनं कोणीच काही बोलत नाही किंवा पोलिसात तक्रारही दाखल होत नाही. हळूहळू छाप्यांची संख्या वाढायला लागते आणि ते सीबीआयच्या रडारवर येतात. इथून पुढे सुरु होतो चोर-पोलिसंाचा खेळ अशी ही साधारण सिनेमाची गोष्ट आहे. 19 मार्च 1987 रोजी मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये त्रिभोवनदास झव्हेरी ज्वेलर्सवर असाच एक बनावट सीबीआय छापा पडला होता. या छाप्याने देशभर खळबळ उडाली होती. याच घटनेवर आधारित आहे स्पेशल छब्बीस... सिनेमातल्या चार चोरांना मोठा गोलमाल करण्यासाठी आणखी लोकांची गरज असते म्हणून ते रितसर इंटरव्हयू घेऊन आणखी बावीस जणांना छाप्यात सामील करुन घेतात. सीबीआयसाठी या अधिकृत मुलाखती आहेत असंही ते भासवतात, असे हे 26 जण म्हणून सिनेमाचं नाव आहे स्पेशल छब्बीस..नीरज पांडेचा हा दुसराच सिनेमा आहे, पण वेन्स्डे नंतर पुढचा सिनेमा करताना त्याने नक्क ीच एक पाऊल पुढे टाकलंय. सिनेमाची कथा आहे 1987 सालातली, त्यामुळे तो काळ उभा करताना प्रचंड मेहनत घेण्यात आली. हा एक कॉन मूव्ही असला तरी त्याची मांडणी करताना कुठेही तो कॉमेडी होणार नाही याची त्याने काळजी घेतली. उगाच स्लॅपस्टिक कॉमेडीचा आधार न घेता प्रसंगातून आपसूक विनोदनिर्मिती झालेली आहे. त्यादृष्टीने पटकथेचं महत्त्व खूप मोठं आहे. खास करून छाप्यांचे प्रसंग शूट करताना ते अगदी खर्‍या छाप्यांसारखे वाटतील असा देखावा निर्माण करण्यात आलाय. सिनेमात उगाचच घुसडण्यात आलेली गोष्ट म्हणजे काजल अगरवालचं कॅरेक्टर... या सिनेमात हिरॉईनची अजिबात गरज नव्हती, पंजाबी लग्नातल्या गाण्याची तर त्याहून गरज नव्हती पण हा मोह नीरज पांडेला आवरता आला नाही याचं आश्चर्य वाटतं. मुळात, अक्षय आणि काजलचा प्रेमाचा ट्रॅक सुरु झाला की सिनेमाचा पेसच कमी होतो, प्रेक्षकाचं लक्ष उडतं.. आपल्या पहिल्या सिनेमात हिरॉईन किंवा गाण्यांची गरज ज्याला वाटली नाही त्या नीरज पांडेला बॉक्स ऑफिसच्या गणितांचा विचार दुसर्‍या सिनेमात करावासा वाटला असंच म्हणायला लागेल. एवढी एक त्रुटी सोडली तर सिनेमा पाहायलाच हवा असा आहे. अभिनयात राजेश शर्मा आणि किशोर कदम यांचं कामही अफलातून झालं आहे. अक्षय कुमारने 'रावडी राठोड'आणि 'हाऊसफुल्ल'चा अवतार बाजूला ठेवून संयत अभिनयाचं दर्शन घडवलंय. अनुपम खेर यांनी अनुभव काय असतो हे दाखवून दिलंय, पण सगळ्यात बाजी मारलीये ती मनोज वाजपेयीनं... सीबीआय अधिकार्‍याची देहबोली, जरब, चोरांबद्दलचा राग, चोरांपर्यंत पोचतोय असं वाटत असताना वाटत असलेली अधीरता हे सगळं साकार करताना मनोज वाजपेयीनं कमाल केली. मनोजच्या फॅन्सना तर बघावाच लागेल हा सिनेमा...

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2013 04:20 PM IST

एक 'स्पेशल' सिनेमा (समीक्षा)

अमोल परचुरे, समीक्षक

08 फेब्रुवारी

'स्पेशल 26' हा दिग्दर्शक नीरज पांडेचा 'वेन्स्डे' नंतरचा दुसराच सिनेमा..मध्यंतरीच्या काळात त्याने 'तार्‍यांचं बेट' या मराठी सिनेमाची निर्मिती केली. पण दिग्दर्शक म्हणून त्याच्या दुसर्‍या सिनेमाबद्दल उत्सुकता होती आणि तो सिनेमा म्हणजे स्पेशल छब्बीस... दबंग आणि रेस 2 सारखे सपक सिनेमे जबरदस्त धंदा करत असताना स्पेशल छब्बीस सारखा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरतो. एक अतिशय जबरदस्त कल्पना आणि त्यावर तेवढ्याच मेहनतीनं साकारलेला सिनेमा 'स्पेशल 26'...1987 चा काळ दाखवण्याची मेहनत असो किंवा कलाकारांनी साकारलेला नैसर्गिक अभिनय, पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी जमून आल्या की काय धमाल येते याचा अनुभव देणारा सिनेमा म्हणजे स्पेशल छब्बीस...अर्थात, सगळ्याच गोष्टी जमलेल्या नाहीत हेसुध्दा तितकंच खरं, पण तरीही कॉन मूव्हीसाठी आवश्यक असलेला सगळा मसाला जमवण्यात नीरज पांडे बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय एवढं खरं...

ही गोष्ट आहे चार तोतया सीबीआय अधिकारी आणि त्यांचा माग काढणार्‍या खर्‍याखुर्‍या सीबीआय अधिकार्‍याची...देशभरात या तोतया अधिकार्‍यांनी उच्छाद मांडलेला आहे. कारण राजकारणी, व्यापारी यांच्या मालमत्तेवर बनावट छापे टाकून चोरीचा नवा धंदाच या खोट्या सीबीआय अधिकार्‍यानी सुरु केलाय. ऐंशीच्या दशकात या अशा लोकांकडे भरमसाठ काळा पैसा खेळत होता आणि त्यांच्यावर सीबीआयच्या छाप्यांचं सत्रही सुरू झालं होतं. याचाच फायदा घेत हे चार तोतया घेतात आणि छापे टाकायला सुरुवात करतात. छापा पडून गेल्यावर जेव्हा तो बनावट होता हे लक्षात येतं तेव्हा नाचक्कीच्या भीतीनं कोणीच काही बोलत नाही किंवा पोलिसात तक्रारही दाखल होत नाही. हळूहळू छाप्यांची संख्या वाढायला लागते आणि ते सीबीआयच्या रडारवर येतात. इथून पुढे सुरु होतो चोर-पोलिसंाचा खेळ अशी ही साधारण सिनेमाची गोष्ट आहे.

19 मार्च 1987 रोजी मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये त्रिभोवनदास झव्हेरी ज्वेलर्सवर असाच एक बनावट सीबीआय छापा पडला होता. या छाप्याने देशभर खळबळ उडाली होती. याच घटनेवर आधारित आहे स्पेशल छब्बीस... सिनेमातल्या चार चोरांना मोठा गोलमाल करण्यासाठी आणखी लोकांची गरज असते म्हणून ते रितसर इंटरव्हयू घेऊन आणखी बावीस जणांना छाप्यात सामील करुन घेतात. सीबीआयसाठी या अधिकृत मुलाखती आहेत असंही ते भासवतात, असे हे 26 जण म्हणून सिनेमाचं नाव आहे स्पेशल छब्बीस..नीरज पांडेचा हा दुसराच सिनेमा आहे, पण वेन्स्डे नंतर पुढचा सिनेमा करताना त्याने नक्क ीच एक पाऊल पुढे टाकलंय. सिनेमाची कथा आहे 1987 सालातली, त्यामुळे तो काळ उभा करताना प्रचंड मेहनत घेण्यात आली. हा एक कॉन मूव्ही असला तरी त्याची मांडणी करताना कुठेही तो कॉमेडी होणार नाही याची त्याने काळजी घेतली. उगाच स्लॅपस्टिक कॉमेडीचा आधार न घेता प्रसंगातून आपसूक विनोदनिर्मिती झालेली आहे. त्यादृष्टीने पटकथेचं महत्त्व खूप मोठं आहे. खास करून छाप्यांचे प्रसंग शूट करताना ते अगदी खर्‍या छाप्यांसारखे वाटतील असा देखावा निर्माण करण्यात आलाय.

सिनेमात उगाचच घुसडण्यात आलेली गोष्ट म्हणजे काजल अगरवालचं कॅरेक्टर... या सिनेमात हिरॉईनची अजिबात गरज नव्हती, पंजाबी लग्नातल्या गाण्याची तर त्याहून गरज नव्हती पण हा मोह नीरज पांडेला आवरता आला नाही याचं आश्चर्य वाटतं. मुळात, अक्षय आणि काजलचा प्रेमाचा ट्रॅक सुरु झाला की सिनेमाचा पेसच कमी होतो, प्रेक्षकाचं लक्ष उडतं.. आपल्या पहिल्या सिनेमात हिरॉईन किंवा गाण्यांची गरज ज्याला वाटली नाही त्या नीरज पांडेला बॉक्स ऑफिसच्या गणितांचा विचार दुसर्‍या सिनेमात करावासा वाटला असंच म्हणायला लागेल. एवढी एक त्रुटी सोडली तर सिनेमा पाहायलाच हवा असा आहे. अभिनयात राजेश शर्मा आणि किशोर कदम यांचं कामही अफलातून झालं आहे. अक्षय कुमारने 'रावडी राठोड'आणि 'हाऊसफुल्ल'चा अवतार बाजूला ठेवून संयत अभिनयाचं दर्शन घडवलंय. अनुपम खेर यांनी अनुभव काय असतो हे दाखवून दिलंय, पण सगळ्यात बाजी मारलीये ती मनोज वाजपेयीनं... सीबीआय अधिकार्‍याची देहबोली, जरब, चोरांबद्दलचा राग, चोरांपर्यंत पोचतोय असं वाटत असताना वाटत असलेली अधीरता हे सगळं साकार करताना मनोज वाजपेयीनं कमाल केली. मनोजच्या फॅन्सना तर बघावाच लागेल हा सिनेमा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2013 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close